शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Whatsapp वर येणार दमदार फीचर; तयार करू शकणार एक्स्ट्रा प्रोफाईल, बदला नाव आणि फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 2:42 PM

1 / 8
Whatsapp युजर्ससाठी लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. त्याच्या मदतीने युजर्स त्यांची प्रायव्हसी मेंटेन करू शकतील. या अपकमिंग फीचरचं नाव अल्टरनेट प्रोफाइल आहे, जे तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू शकाल.
2 / 8
अल्टरनेट प्रोफाइल फीचरच्या मदतीने, Whatsapp युजर्स एक्स्ट्रा प्रोफाइल तयार करण्यास सक्षम असतील. Wabetainfo ने माहितीमध्ये सांगितलं आहे की, इन्स्टंट मेसेजिंग एप एका नवीन फीचरवर काम करत आहे.
3 / 8
Wabetainfo ने या फीचरला Alternate profile असं नाव दिलं आहे. त्याच्या मदतीने, युजर्स एक एक्स्ट्रा प्रोफाइल तयार करू शकतात आणि ते अनोळखी लोकांसह शेअर करू शकतात.
4 / 8
Whatsapp वर अल्टरनेट प्रोफाईल तयार करणं खूप सोपं काम असेल. Wabetainfo ने या फीचरबद्दल डिटेल्स शेअर करण्यासाठी स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये Alternate profile चा पर्याय दिलेला आहे, त्याच्या शेजारी एडिट बटण देखील आहे.
5 / 8
Whatsapp चे हे अपकमिंग फीचर अद्याप डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. आतापर्यंत याचे अपडेट बीटा व्हर्जनमध्येही दिलेले नाही. मात्र, Wabetainfo ने हे फीचर दाखवण्यासाठी स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
6 / 8
Wabetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असं लिहिलं आहे की, जर तुम्हाला तुमचा फोटो लिमिटेड ठेवायचा असेल तर तुम्ही अल्टरनेट फोटो आणि नाव वापरू शकता. बायोमध्ये बदल करण्याचा पर्याय असेल की नाही हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
7 / 8
Wabetainfo ने सांगितलं की त्यांना विश्वास आहे की या अपकमिंग फीचरच्या मदतीने युजर्स त्यांचे मूळ प्रोफाइल अनोळखी लोकांपासून लपवू शकतील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही अल्टरनेट प्रोफाइलमध्ये एक छोटं नाव, दुसरं नाव किंवा दुसरा फोटो लावू शकता.
8 / 8
Whatsapp च्या आगामी फीचर्सचे तोटेही दिसू शकतात. त्याच्या मदतीने काही लोक इतरांच्या डोळ्यात धूळफेक करू शकतात. Whatsapp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून ते सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान