whatsapp draft message feature what is it and how it works
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 3:10 PM1 / 9WhatsApp ने एक नवीन फीचर जारी केलं आहे, जे iOS आणि Android युजर्सना मिळेल. कंपनीने हे फीचर ग्लोबली रोलआऊट केलं आहे.2 / 9WhatsApp ड्राफ्ट मेसेजबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत. ज्याच्या मदतीने, युजर्स त्यांचे अपूर्ण मेसेज ट्रॅक करण्यास सक्षम असतील आणि ते पूर्ण देखील करू शकतील.3 / 9या फीचरमध्ये कोणताही अपूर्ण मेसेज हा ड्राफ्टच्या लेबलसह दिसेल आणि ते चॅट मूव्ह करून टॉपवर नेईल. यामुळे आपल्याला तो मेसेज सहज एक्सेस करता येईल. 4 / 9म्हणजेच तुम्ही एखादा मेसेज अपूर्ण ठेवला तर तो आपोआप या फीचरमुळे चॅट टॉपवर पोहोचेल आणि त्यावर तुम्हाला ड्राफ्टचं लेबलही दिसेल.5 / 9यामुळे तुम्हाला अपूर्ण मेसेजची आठवण होईल. हे फीचर अशा लोकांसाठी खूप उपयुक्त आहे जे अनेकदा मेसेज टाईप करतात आणि पाठवायला विसरतात.6 / 9WhatsApp वर एकाच वेळी अनेक जणांशी चॅट करताना लोकांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, ड्राफ्ट मेसेज पहिला इनव्हिजिबल असायचा. 7 / 9आता असं होणार नाही. कोणत्याही ड्राफ्ट मेसेजसह तुम्हाला ड्राफ्टचं आता लेबलही दिसेल, जे हिरव्या रंगाचं असेल. तसंच या चॅटही समोर येईल.8 / 9अशाप्रकारे, तुम्ही कोणत्याची चॅटमध्ये ड्राफ्ट असलेल्या मेसेजची माहिती सहजपणे मिळवू शकाल आणि ते संभाषण पूर्ण करू शकाल.9 / 9अलीकडेच कंपनीने या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फीचर्स जोडली आहेत. या वर्षी अँड्रॉइड युजर्ससाठी UI पूर्णपणे बदलण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications