whatsapp to end support for older ios and android version
उद्यापासून 'या' स्मार्टफोन्सवर WhatsApp सपोर्ट मिळणार नाही, होऊ शकते बंद! By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 31, 2020 7:54 PM1 / 9इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. ते अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर चांगले चालते. मात्र, आता काही अँड्रॉईड फोन आणि आयफोन युझर्सना व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही. कारण काही ठराविक फोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होणार आहे.2 / 9यामुळे संबंधित युझर्सला त्यांचे फोन अपग्रेड करावे लागणार आहेत, अथवा काहींना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी त्यांच्या फोनची सिस्टिम अपडेट करावी लागणार आहे.3 / 9कंपनी सातत्याने WhatsAppमध्ये नवे फिचर्स आणि सिक्योरिटी पॅच देते. यामुळे कंपनीचे म्हणणे आहे, की अत्यंत जुन्या झालेल्या स्मार्टफोनच्या हार्टवेअर आणि सॉफ्टवेअरमुळे त्यांत नवे फिचर्स आणि पॅच देता येऊ शकत नाहीत. यामुळे त्यांतीत सपोर्टदेखील बंद करण्यात येईल.4 / 91 जानेवारी 2021पासून काही जुन्या आयफोनसह अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये WhatsApp चालणे बंद झाल्यास आश्चर्य वाटायला नको.5 / 9कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, iOS 9 पेक्षा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या आयफोनवर आणि अँड्रॉईड स्मार्टफोन जे Android 4.0.3 व्हर्जनपेक्षा जुन्या सॉफ्टवेअरवर चालतात, त्यांत WhatsApp सपोर्ट दिला जाणार नाही. 6 / 9हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होत आहे.7 / 9जगभरात एवढे जुने व्हर्जन्स असलेला स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. यामुळे WhatsAppच्या या निर्णयाचा फटका अधिक यूझर्सना बसणार नाही.8 / 9जर आपणही जुना आयफोन अथवा जुन्या व्हर्जनचा अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल, तर तपासून घ्या आणि त्याचे सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध असल्यास ते अपडेट करून घ्या.9 / 9मात्र, आपण वापरत असलेल्या जुण्या फोनचे अपडेट उपलब्ध नसेल, तर आपल्याला WhatsApp वापरण्यासाठी कदाचित आपला स्मार्टफोन अपग्रेड करावा लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications