शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वरील तुमचे Secret Chats आता कोणीही वाचू शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 12:07 PM

1 / 8
व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) सर्वाधिक वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे युजर्संना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप ही समस्या दूर करत आहे.
2 / 8
तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटसाठी संपूर्ण लॉगिन प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आता डबल व्हेरिफिकेशन कोड फीचरवर काम करत आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये लॉग इन करताना अॅप अधिक सुरक्षित होईल. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल.
3 / 8
WABetaInfo या व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरला ट्रॅक करणाऱ्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने कंपनीला एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर लॉग इन करण्यापूर्वी त्याच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला व्हेरिफाय करावे लागेल.
4 / 8
फीचर सुरू केल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर इतर कोणत्याही डिव्हाइसवर लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला जुन्या डिव्हाइसवर 6 अंकी कोड मिळेल. तुम्हाला तुमच्या नवीन डिव्हाइसवर हा कोड टाकावा लागेल. कोड मॅच झाल्यानंतरच तुम्ही नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करू शकाल.
5 / 8
6 अंकी कोड व्हेरिफिकेशन प्रोसेस मजबूत करेल. जेव्हाही तुम्ही नवीन फोनवरून व्हॉट्सअॅपवर लॉग इन करता तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर 6 अंकी ऑटोमॅटिक कोड पाठवला जातो. माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी हे केले जाते.
6 / 8
व्हॉट्सअॅपवर बनावट लॉगिनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या डबल व्हेरिफिकेशन कोडचा उद्देश व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन प्रक्रिया मजबूत करणे आणि अकाउंटमधील वैयक्तिक माहिती आणि डेटाचा गैरवापर रोखणे हा आहे.
7 / 8
रिपोर्टनुसार, हे फीचर आल्यानंतर, जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसवर जुन्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल. त्यावर लिहिलेले असेल की 'हे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट पहिल्यापासून कोणत्याही डिव्हाइसवर लॉग इन आहे.
8 / 8
तुम्हाला अजूनही व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करायचे असल्यास, जुन्या डिव्हाइसवर पाठवलेला कोड नवीन डिव्हाइसवर एंटर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे लोकांना समजेल की कोणीतरी त्यांच्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते इतर कोणताही व्हेरिफिकेशन कोड शेअर करू शकणार नाहीत.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान