whatsapp features expected in 2022
न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 11:11 AM1 / 6यंदा व्हॉट्सॲप अँड्रॉइड युझर्सना आयओएसवर चॅट ट्रान्सफर करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.या फीचरच्या साह्याने अँड्रॉइड युझर्स आयओएसवर शिफ्ट झाल्यास ते त्यांचे चॅट्स तिकडे ट्रान्सफर करू शकणार आहेत. 2 / 6कंपनीने गेल्या वर्षी आयओएस आणि अँड्रॉइड यांच्यात चॅट ट्रान्सफर सुरू केले होते. युझर्स त्यांची चॅट हिस्ट्री आयफोनवरून अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये ट्रान्सफर करू शकतात.3 / 6ग्रुप चॅटवर ॲडमिनचे नियंत्रण वाढावे यासाठी व्हॉट्सॲप नव्या फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सॲपवर ॲडमिन लवकरच ग्रुप चॅटमध्ये पोस्ट करण्यात आलेला मेसेज हटवू शकणार आहे. 4 / 6व्हॉट्सॲप ग्रुपवरील एखादा मेसेज ॲडमिन हटवणार असेल तर ग्रुपमधील सदस्यांना त्याची सूचना दिली जाईल. हे फीचर डिसॲपिअरिंग मेसेजपेक्षा वेगळे असेल. ॲडमिन त्याचा हवा तेव्हा वापर करू शकेल.स्टिकर स्टोअर 5 / 6व्हॉट्सॲपवर खूप स्टिकर असतात. ही सुविधा डेस्कटॉप आणि वेब ॲप्सवर नाही. आता व्हॉट्सॲपने स्टिकर स्टोअरला डेस्कटॉप ॲपच्या बिटा व्हर्जनमध्ये ॲड केले आहे. तूर्तास ते बिटा ॲपवर उपलब्ध आहे. परंतु लवकरच ते डेस्कटॉप आणि वेब ॲप्सवर उपलब्ध करण्याची शक्यता आहे. 6 / 6वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपला एखाद्या ग्रुपमध्ये एकसाथ सहभागी होण्याची परवानगी देईल. युझर्स अशा दहा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतील. बिझनेस नियरबाय’ हे नवे फीचरही यंदाचे आकर्षण ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications