शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वर मेसेज आला अन् गायब झाले 57 कोटी; 'Hi Mum'ने वाढवलं टेन्शन, करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 1:41 PM

1 / 7
इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कौटुंबिक असो वा कार्यालयीन काम, सर्वत्र संपर्काचे ते सोपे माध्यम बनले आहे. त्याच्या मदतीने एखाद्याला मेसेज करणे, कॉल करणे आणि व्हिडीओ कॉल करणे सोपे झाले आहे. पण आता अनेक लोक फसवणूक करण्यासाठी याचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
2 / 7
WhatsApp चा वापर करून लाखोंचा गंडा घातल्याच्या घटना आता उघडकीस येत आहेत. त्यामुळे युजर्सना अधिक अलर्ट राहण्याची गरज आहे. WhatsApp मेसेजच्या मदतीने एखाद्याचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. कुटुंबातील असल्याचे भासवून फसवणूक करणारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची खाती रिकामी करत आहेत.
3 / 7
द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, 'Hi Mum' नावाचा घोटाळ्याची सध्या ऑस्ट्रेलियामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या घोटाळ्यामुळे 2022 मध्ये ऑस्ट्रेलियातील शेकडो WhatsApp युजर्सचे तब्बल 57 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
4 / 7
ऑस्ट्रेलिया कंझ्युमर अँड कॉम्पिटिशन कमिशन (ACCC) च्या मते, गेल्या 3 महिन्यांत घोटाळ्यांना बळी पडणाऱ्यांच्या संख्येत 10 पट वाढ झाली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी WhatsApp द्वारे पीडितांशी संपर्क साधला आणि नंतर कुटुंबातील सदस्य असल्याचे दाखवून त्यांचा फायदा घेतला.
5 / 7
आपला फोन हरवला आहे किंवा खराब झाला आहे, असे सांगून फसवणूक करणारे WhatsApp वर कुटुंबातील सदस्य किंवा मित्र म्हणून संपर्क करतात. यानंतर, नवीन नंबरवर संपर्क साधून भावनिक मेसेज लिहिण्याचा प्रयत्न करतात.
6 / 7
पीडितांचा विश्वास जिंकल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगितले. मदत करावी म्हणून ते पैसे ट्रान्सफर करतात आणि अशा जाळ्यात अडकतात. सध्या 'Hi Mum' ने अनेकांची झोप उडवली आहे.
7 / 7
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मात्र भारतात सध्या तरी Hi Mum स्कॅमची अशी एकही तक्रार आलेली नाही. ही प्रकरणे ऑस्ट्रेलियात नोंदली जात आहेत, परंतु आपण देखील सतर्क राहणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAustraliaआॅस्ट्रेलिया