WhatsApp मध्ये लवकरच येऊ शकतात 'हे' 5 नवीन फीचर्स, चॅटिंगचा अनुभव होणार आणखी मजेदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:34 IST
1 / 6व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. हे युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी नवीन फीचर्स जारी करत आहे. कंपनी सध्या अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. या फीचर्समुळे युजर्सचा चॅटिंगचा अनुभव आणखी मजेदार होईल. WhatsApp वर लवकरच काही नवी फीचर्स पाहायला मिळतील.2 / 6अलीकडेच असा रिपोर्ट आला होता की, WhatsApp युजर्ससाठी मेसेज डिलीट करण्याची वेळ मर्यादा (Time Limit) बदलणार आहे. सध्या, WhatsApp हे 1 तास, 8 मिनिटे आणि 16 सेकंदांपर्यंत पाठवलेले मेसेज डिलीट करण्याचा ऑप्शन देत आहे. WABetaInfo नुसार, कंपनी ते 7 दिवसांपर्यंत वाढवू शकते.3 / 6WhatsApp लवकरच यूजर्सला ऑडिओ प्लेबॅक स्पीड कंट्रोल करण्याचे फीचर देऊ शकते. यामुळे युजर्स ऑडिओ मेसेज किंवा व्हॉइस नोट्सच्या प्लेबॅक स्पीडवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील.4 / 6WhatsApp एका नवीन फीचरची टेस्ट करत आहे. या फीचरमुळे युजर्स कोणत्याही स्पेसिपिक कॉन्टॅक्टपासून आपला प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि स्टेटसला हाइड करू शकतील. या फीचरची सध्या Android आणि iOS साठी टेस्ट केली जात आहे.5 / 6WhatsApp इन-अॅप फोटो एडिटर अॅप आणण्यावरही काम करत आहे. कंपनीने या फीचरची अधिकृत घोषणाही केली आहे. WhatsApp web साठी फोटो एडिटर टूल आणण्यावर काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.6 / 6कंपनीने WhatsApp web साठी स्टिकर मेकर टूल जारी केले आहे. आता रिपोर्ट येत आहे, हे फीचर मोबाईल अॅपसाठीही येणार आहे. सध्या, व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स पाठवण्यासाठी तुम्हाला प्री-लोडेड स्टिकर्स किंवा कोणतेही थर्ड पार्टी अॅप वापरावे लागेल.