शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp Golden Logo: व्हॉट्सअ‍ॅपच्या हिरव्या रंगाचा कंटाळा आलाय? मग सोनेरी रंग ट्राय करा; संपूर्ण स्टेप्स पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 8:58 PM

1 / 6
व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशनच्या लोगोचा रंग हिरवा असल्याचं आपल्याला माहितच आहे. पण तो पाहून तुम्ही वैतागला असाल तर एक नवा पर्यात तुम्हाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा रंग कसा बदलायचा याची पद्धत आपण आता जाणून घेणार आहोत.
2 / 6
तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या लोगोचा रंग सोनेरी रंगाचा करायचा असेल तर पुढील सूचनाचं तंतोतंत पालन करावं लागणार आहे. युझर थर्डपार्टी अ‍ॅप वापरुन हिरव्या रंगाचा आयकन सोनेरी रंगात बदलता येणार आहे.
3 / 6
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये नोव्हा लॉन्चर डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर अ‍ॅप उघडून तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर तुमची पसंतीची स्टाइल निवडावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला गोल्डन WhatsApp लोगो शोधावा लागेल. यात तुम्हाला सर्वात जास्त जे आवडेल ते डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
4 / 6
केल्यानंतर होम स्क्रीनवर यावं लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकनवर लाँग प्रेस करुन ठेवा. असं केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकनचा रंग बदलेला तुम्हाला पाहायला मिळेल.
5 / 6
पुढे तुम्हाला स्क्रीनवर एडिटिंग पेन्सिल पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा आणि तुमच्या फोन गॅलरीमध्ये जाऊन नोव्हा अ‍ॅपचा वापर करुन डाऊनलोड केलेली गोल्डन व्हॉट्सअ‍ॅप इमेज सिलेक्ट करा. अशापद्धतीनं तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हिरवा रंग आता सोनेरी झालेला पाहायला मिळेल.
6 / 6
व्हॉट्सअ‍ॅपच्या मते थर्ड पार्टी अ‍ॅप्स युझर्सच्या सुरक्षेशी तडजोड करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची हमी व्हॉट्सअ‍ॅप देऊ शकत नाही. युझर्सची माहिती हॅक देखील केली जाण्याची शक्यता असते.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान