whatsapp guide whatsapp hidden features make users life easier
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणारे 'हे' सीक्रेट फीचर्स माहितीहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 6:31 PM1 / 10व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून ते सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार आहे. 2 / 10व्हॉट्सअॅप चॅटिंग खूप मजेशीर करणारे काही सीक्रेट फीचर्स हे उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याच जणांना याबाबत माहीत नाही. भन्नाट फीचर्स युजर्सच्या चॅट्सचा अनुभव दुप्पट मजेशीर करतात. अशाच सीक्रेट फीचरबद्दल जाणून घेऊया...3 / 10व्हॉट्सअॅप मेसेजच्या पुढील ब्लू टिक ही तुमचा मेसेज वाचला गेला आहे की नाही याबाबत माहिती देते. जर मेसेज समोर असलेली टीक ब्लू झाली तर मेसेज रिड म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून वाचला गेला आहे हे समजतं. 4 / 10मात्र ज्यावेळी युजर्सना समोरच्या व्यक्तीच्या मेसेजला उत्तर द्यायचे नसते. त्यावेळी हे फीचर थोडी समस्या निर्माण करते. हे बंद करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय मिळेल, जिथून तुम्ही हे फीचर बंद करू शकता. 5 / 10प्रायव्हेट रिप्लाय हे व्हॉट्सअॅपचे खास फीचर आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही ग्रुप चॅटमध्ये येणाऱ्या कोणत्याही मेसेजला प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकता. जेणेकरून ग्रुपमधील एखाद्या सदस्याला त्याच्या मेसेजचा रिप्लाय हा प्रायव्हेटली देता येईल. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर जावे लागेल 6 / 10तुम्हाला ज्या मेसेजला प्रायव्हेट रिप्लाय द्यायचे आहे त्यावर प्रेस आणि होल्ड करावे लागेल. यानंतर तुम्हाला तीन डॉट्सचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. हे केल्यानंतर, तुम्हाला रिप्लाय प्रायव्हेटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या युजर्सच्या प्रायव्हेट चॅट विंडोवर पोहचाल. येथे तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकाल.7 / 10व्हॉट्सअॅप आपोआप फोटो आणि व्हिडीओ तुमच्या फोनच्या गॅलरीत डाऊनलोड करतो. यामुळे अनेक युजर्सना अडचणी येऊ शकतात. अनेकदा ग्रुपमध्ये आलेले काही फोटो हे उपयोगाचे नसतात किंवा ते आपल्या फोनमध्ये नको असतात पण ऑटो मीडिया डाऊनलोडमुळे ते आपोआप डाऊनलोड होतात. 8 / 10जर तुम्हालाही यात अडचण येत असेल तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन मीडिया ऑटो-डाऊनलोड हे फीचर बंद करू शकता. व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये तुम्हाला हा पर्याय दिसेल. त्यावर किलक करून नको असलेल्या फोटो आणि व्हिडीओपासून आपली सुटका करा. 9 / 10व्हॉट्सअॅपवर जर तुम्हाला तुमचा प्रोफाईल पिक्चर कोणी पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला त्यात फोटो हाईड करण्याचीही सुविधा मिळते. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्ज आणि अकाऊंटवर जावे लगेल. यानंतर आता प्रायव्हसीवर क्लिक करा. हे केल्यानंतर, प्रोफाईल फोटोचा पर्याय दिसेल. 10 / 10यामध्ये तुम्हाला एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबडीचा पर्याय मिळेल. या तिघांपैकी कोणता पर्याय हवा तो निवडा. यानंतर कोणीही तुमचा प्रोफाईल फोटो पाहू शकणार नाही. या व्यतिरिक्त, तुम्ही माय कॉन्टॅक्ट्स पर्याय देखील निवडू शकता. यामध्ये, फक्त तेच तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकतील, ज्यांना तुम्हाला फोटो दाखवायचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications