शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारीच! WhatsApp ने लाँच केले Screen Sharing, आता कॉन्फरन्स फोनवरच घेता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 2:28 PM

1 / 11
WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर देत असते. WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. हे जगभरातील अब्जावधी लोक वापरतात. आता या प्लॅटफॉर्मवर एक नवीन आणि महत्त्वाचे फीचर लॉन्च करण्यात आले आहे. या नव्या फिचरचे नाव स्क्रीन शेअरिंग आहे.
2 / 11
हे फीचर यूजर्सना व्हिडीओ कॉलिंग दरम्यान मोबाईल स्क्रीन शेअर करण्याची सुविधा देईल. याच्या मदतीने यूजर फोनवरील कंटेंट इतरांना दाखवण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी मदत घेऊ शकतो.
3 / 11
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या फीचरची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, आम्ही व्हॉट्सअॅपच्या व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रीन शेअरिंगची सुविधा जोडत आहोत.
4 / 11
व्हॉट्सअॅपमध्ये स्क्रीन शेअरिंग फीचरचा समावेश केल्यानंतर इतर मेसेजिंग अॅपसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. अनेक WhatsApp वापरकर्ते स्क्रीन शेअरिंगसाठी Google Meet आणि Zoom सारखे प्लॅटफॉर्म वापरतात.
5 / 11
स्क्रीन शेअरिंग फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप यूजर्संना बरीच सुविधा मिळणार आहे. ते मीटिंग दरम्यान इतर वापरकर्त्यांसह दस्तऐवज आणि इतर सामग्री प्रदर्शित करण्यास सक्षम असतील.
6 / 11
यासह, वापरकर्ते त्यांच्या डॉक्टर आणि कुटुंबातील सदस्यांसह स्क्रीन सामायिक करून व्हिडीओ कॉलवर प्रश्न विचारण्यास सक्षम असतील.
7 / 11
इतकेच नाही तर ज्या तरुणांना फोनच्या सेटिंग्ज किंवा मेसेजबद्दल पालकांना सांगायचे आहे, त्यांनाही त्याचा वापर करता येणार आहे.
8 / 11
स्क्रीन शेअरिंग फीचर कसे वापरावे? -व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शेअरिंग फीचर वापरण्यासाठी यूजर्सला व्हिडीओ कॉल दरम्यान 'शेअर' नावाच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, वापरकर्ते विशिष्ट अनुप्रयोग किंवा संपूर्ण स्क्रीन फिचर वापरण्यास सक्षम असतील.
9 / 11
हे फिचर तुम्हाला ऑनलाइन स्कॅमपासून वाचवेल WhatsApp व्हिडीओ कॉल मर्यादा WhatsApp व्हिडीओ कॉलसाठी मर्यादा आहे. व्हिडीओ कॉल दरम्यान 32 पर्यंत लोकांचा समावेश केला जाऊ शकतो.
10 / 11
व्हॉट्सअॅपवर एक छोटीशी बैठक आयोजित केली जाऊ शकते. हे फिचर वेबवर काम करेल की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
11 / 11
हे स्क्रीन शेअरिंग फीचर याआधी बीटा व्हर्जन यूजर्ससाठी होते. पण आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी आणले आहे. आता हे फीचर लवकरच सर्व यूजर्सपर्यंत पोहोचणार आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान