शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp'ने भारतात 'हे' फीचर सुरू केले, आता व्हॉइस मेसेज टेक्स्टमध्ये वाचता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:39 IST

1 / 9
व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट देत असतं. आता वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअपने भारतात व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर लाँच केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्लॅटफॉर्मने या फिचरची घोषणा केली होती.
2 / 9
पण आता तुम्ही व्हॉट्सॲपवरच व्हॉइस मेसेजचे टेक्स्ट ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यासाठी डिव्हाइसवर प्रक्रिया करू शकता. हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड अॅपवर दिसू लागले आहे. लवकरच ते iOS अॅपवर लाँच केले जाऊ शकते.
3 / 9
यामुळे आता तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी व्हॉइस मेसेज ऐकण्याची गरज भासणार नाही. तुम्ही व्हॉइस मेसेजेस ट्रान्सक्राइब करू शकता. त्यानंतर हा संदेश तुमच्या समोर लिहिलेल्या स्वरुपात दिसेल.
4 / 9
सध्या ट्रान्सक्रिप्टसाठी हिंदी भाषेला सपोर्ट मिळत नाही, पण या फिचरद्वारे, हिंदीमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हॉइस नोट्ससाठी मजकूर ट्रान्सक्रिप्ट पाहता येईल.
5 / 9
यामध्ये अधिकृतपणे या फिचरमध्ये इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि रशियन भाषांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपचे हे फिचर सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही जर एखाद्या मिटींगमध्ये असाल तेव्हा तुम्ही तो नोट न ऐकत वाचू शकता.
6 / 9
मेटाने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील ट्रान्सक्रिप्ट पूर्णपणे डिव्हाइसवर तयार केल्या जातात. व्हॉट्सअॅपला त्याच्या ऑडिओ किंवा टेक्स्टमध्येही प्रवेश राहणार नाही. व्हॉट्सअॅप जवळही ऑडिओ आणि टेक्सचा अॅक्सेस नसणार आहे.
7 / 9
जर तुम्हाला डिफॉल्टनुसार व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट सक्षम करायचे असेल, तर तुम्ही या प्रक्रियेच्या मदतीने ते सक्रिय करू शकता. यासाठी तुम्ही आधी व्हॉट्सअॅप सेटिंग्ज उघडा. येथे तुम्ही चॅट विभागात जा. व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट पर्याय निवडा. यानंतर ते सुरू करा. भाषा निवडण्यासाठी, येथे दिलेल्या यादीतून एक भाषा निवडा. सेट अप पर्यायावर क्लिक करा.
8 / 9
तुम्ही कधीही मोअर पर्यायावर क्लिक करू शकता. सेटिंग्ज आणि चॅट पर्यायांवर जा. यानंतर, तुम्ही ट्रान्सक्रिप्ट पर्यायावर क्लिक करून ट्रान्सक्रिप्ट भाषा बदलू शकता.
9 / 9
चॅटमध्ये व्हॉइस नोट ट्रान्सक्राइब करण्यासाठी, व्हॉइस मेसेज काही सेकंदांसाठी दाबा आणि धरून ठेवा. More वर जा आणि Transcribe वर क्लिक करा. मजकूर ट्रान्सक्रिप्ट व्हॉइस नोटमध्ये जे सांगितले आहे ते मजकूर बॉक्समध्ये दिसेल.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMetaमेटा