whatsapp leak reveals cashback feature coming on whatsapp payments
लवकरच WhatsApp वरून पेमेंट केल्यास मिळणार कॅशबॅक? By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 2:23 PM1 / 6इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरही (WhatsApp) यूपीआय (UPI) सेवा देण्यात आली आहे. याद्वारे युजर्स एकमेकांना पैसे पाठवू शकतात. एका रिपोर्टनुसार, फार कमी लोक व्हॉट्सअॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) फीचर वापरतात. 2 / 6आता कंपनी व्हॉट्सअॅप पेमेंट्सचा युजर्संनी वापर करावा, यासाठी कॅशबॅक ऑफरवर काम करत आहे. एका लीकनुसार, व्हॉट्सअॅप कॅशबॅक फीचरवर काम करत आहे. हे फ्युचर अपडेटसोबत जारी केले जाऊ शकते. 3 / 6यामुळे कंपनीला व्हॉट्सअॅप पेमेंट्स फीचर वापरणारे युजर्स वाढवायचे आहेत. व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. WABetaInfo नुसार, व्हॉट्सअॅप नवीन पेमेंट फीचर कॅशबॅकवर काम करत आहे. 4 / 6हे फीचर लवकरच भारतात रिलीज होऊ शकते. तसेच, हे फीचर सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि याला सध्या युजर्स अॅक्सेस करू शकत नाहीत. आत्ता हे फीचर बीटा व्हर्जनवर देखील उपलब्ध नाही.5 / 6याच्या उर्वरित फीचर्सची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. लीकरने यासंदर्भात एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यामध्ये गिफ्ट आयकॉन सोबत, गेट कॅशबॅक ऑन युवर नेक्स्ट पेमेंट असे लिहिलेले आहे. लीकरच्या म्हणण्यानुसार, हे फीचर फक्त भारत UPI पेमेंट होईपर्यंत ठेवले जाईल.6 / 6युजर्सला पेमेंटवर 10 रुपयांचा कॅशबॅक दिला जाऊ शकतो. दरम्यान, हे आधीच स्पष्ट झालेले नाही की, व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे केलेल्या पहिल्या पेमेंटवर कॅशबॅक मिळेल की नाही किंवा जे आधीच नोंदणीकृत आहेत, त्यांनाही कॅशबॅक दिला जाईल. येत्या काळात कंपनी याबाबत घोषणा करू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications