Whatsapp may release lock chat feature soon it will add extra layer of security
कमाल! Whatsapp वर सिंगल चॅट करता येणार लॉक; कोणाचीच नाही भीती, प्रायव्हसी होणार मजबूत By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 1:57 PM1 / 8इन्स्टंट मेसेजिंग एप Whatsapp आपल्या युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन नवनवीन फीचर्सचं टेस्टिंग करत आहे. Whatsapp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. आता या यादीत एका अतिशय उपयुक्त फीचरचे नावही जोडले गेले आहे. ‘Lock Chat’ असं या नव्या दमदार फीचरचं नाव आहे.2 / 8नावाप्रमाणेच हे चॅट लॉकिंग फीचर आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स आता प्लॅटफॉर्मवर एकच चॅट लॉक करू शकतील. याआधी Whatsapp लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होती, पण आता तुम्ही Whatsapp मधील प्रत्येक चॅट लॉक करू शकाल, जी तुम्हाला सीक्रेट ठेवायची आहेत.3 / 8Wabetainfo ने आपल्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये 'लॉक चॅट' फीचरबद्दल माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, Whatsapp लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर लॉक चॅट फीचर आणणार आहे, ज्याच्या मदतीने युजर्स आता एपमध्ये कोणतीही एक चॅट लॉक करू शकतील. 4 / 8Whatsapp वर निश्चितपणे हे फीचर युजर्सची प्रायव्हसी आणखी मजबूत करेल आणि सुरक्षिततेचा एक नवीन स्तर जोडेल. सध्या हे जबरदस्त फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे, जे फ्यूचर अपडेटसह रोलआऊट केलं जाऊ शकतं. 5 / 8Wabetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की युजर्सना त्यांचं खासगी चॅट लॉक करण्यासाठी फिंगरप्रिंटचा पर्याय दिला जाईल. तुम्ही चॅटमध्ये हा पर्याय टॉगल ऑन करताच, ते चॅट लॉक होईल.6 / 8चॅट उघडण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी फिंगरप्रिंट लावावे लागेल. त्यामुळेच इतर कोणतीही व्यक्ती तुमची चॅट उघडू शकणार नाही. याच दरम्यान, WhatsApp निवडक बीटा टेस्टर्ससाठी एडिट फीचर आणत आहे. 7 / 8Whatsapp फीचर युजर्सना कीबोर्डच्या वरच्या डिस्प्ले फॉन्ट पर्यायांपैकी एकावर टॅप करून फॉन्ट दरम्यान लवकर स्विच करण्याची परवानगी देते. Whatsapp आता युजर्ना अनावश्यक फॉन्ट त्वरीत निवडण्याची परवानगी देतं.8 / 8Whatsapp लवकरच 'डिसेपियरिंग मेसेजेस' मोडमध्ये नवीन ड्युरेशन ऑपश सादर करणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही हा मोड 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवस चालू ठेवू शकता. त्याच वेळी, आता रिपोर्टनुसार, इन्स्टंट मेसेजिंग एपला लवकरच नवीन टाईम ड्युरेशन ऑप्शन मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications