Whatsapp message deleted? Don't worry; Use this trick and get back ...
व्हॉट्स अॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 4:59 PM1 / 8जर कोणत्याही कारणाने तुमचे व्हॉट्स अॅपवरील मॅसेज डिलीट झाले असतील आणि ते खूप महत्वाचे असतील तर काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. कारण हे मॅसेज पुन्हा रिकव्हर करता येतात. यासाठी खूप हुशार असण्याचीही गरज नाही. केवळ एका ट्रीकद्वारे हे मॅसेज परत मिळविता येणार आहेत. 2 / 8लक्षात असू द्या हे फिचर व्हॉट्सअॅपवर नाही. तर फाईल मॅनेजरवर असणार आहेय. जर तुमच्याकडे इनबिल्ट फाईल मॅनेजर नसेल तर तो डाऊनलोड करावा. यानंतर व्हॉट्सअॅपच्या फोल्डरमध्ये जावे. हे फोल्डर अँड्रॉईड आणि अॅपल या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असतात. 3 / 8यानंतर तुम्हाला WhatsApp डाटाबेस फोल्डरवर टॅप करावे लागेल. या फोल्डरमध्ये गेल्यावर तुम्हाला ‘msgstore.db.crypt12’ या नावाची फाईल दिसेल. याशिवाय अशा अन्य फाईलही असतील. ही फाईल शोधून त्यावर लाँग प्रेस करावे लागेल. 4 / 8यानंतर या फाईलच्या मेनू ऑप्शनमध्ये जाऊन रिनेम करावी लागेल. ‘msgstore_backup.db.crypt12’ या नावाने रिनेम करावी. असे केल्याने ही फाईल ओव्हरराईट होणार नाही. 5 / 8यानंतर सर्वात नवीन फाईल जिचा वेळ, तारीख पाहून निवडावी. तिचे नाव बदलून ‘msgstore.db.crypt12’ करावे. 6 / 8यानंतर गुगल ड्राईव्हवर जाऊन उजव्या बाजुच्या तीन डॉटवर क्लीक करावे. यातून लेटेस्ट बॅकअप फाईल डिलीट करावी. यानंतर व्हॉट्सअॅपला अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे. 7 / 8अॅप इन्स्टॉल करताना रिस्टोअर मॅसेज ऑप्शनवर जाऊन बॅकअप सिलेक्ट करावा. 8 / 8तेथे गेल्यावर msgstore.db.crypt12 फाईल सिलेक्ट करून रिस्टोअर करावी. याद्वारे तुमचे जुने मॅसेजही रिकव्हर होणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications