whatsapp mute video feature launched know how to use it
WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! Mute Video फीचर झालं लाँच, जाणून घ्या कसा करायचा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 4:40 PM1 / 16व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. याच दरम्यान आता युजर्ससाठी WhatsApp Mute Video फीचरला अखेर कंपनीने लाँच केलं आहे. याआधी व्हॉट्सअॅपचं हे फीचर टेस्टिंगसाठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध होते. 2 / 16व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट फीचर्सला ट्रॅक करणाऱ्या ब्लॉग WABetaInfo ने गेल्या महिन्यात या फीचरची माहिती दिली होती. आता फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीने ट्विटरवर याची घोषणा केली आहे. 3 / 16म्यूट व्हिडीओ फीचर सर्वसाधारण युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. WABetaInfo ने आधी काही युजर्संच्या हवाल्याने सांगितले होते की, अॅप बीटा व्हर्जनला वापर करीत असलेले यूजर्स v2.21.3.13 द्वारे नवीन फीचरला रिसिव्ह करू शकतील.4 / 16हे फीचर युजर्सला कोणत्याही व्हिडीओला आपल्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करण्याआधी म्यूट करू शकतील. नवीन म्यूट व्हिडीओ फीचरमध्ये व्हिडीओ एडिटिंग स्क्रीनवर पाहिले जाऊ शकतो. 5 / 16व्हिडीओ एडिट स्क्रीनवर सर्वात वरच्या कोपऱ्यात एक व्हॅल्यूम आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर शेअर केले जाणार आहे. त्यानंतर व्हिडीओ म्यूट होणार आहे. या फीचरचा वापर नेमका कसा करायचा हे जाणून घेऊया.6 / 16पहिली स्टेप - सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर व्हॉट्सअॅप उघडा. आपल्या अॅपवर अपडेट करा. (जर अपडेट केलेलं नसेल तर)7 / 16दुसरी स्टेप - फोनमधील व्हॉट्सअॅपमध्ये जा. म्यूट व्हिडीओ फीचर इंड्यूविज्यूअल चॅट आणि स्टेट्स मोड दोन्ही उपलब्ध आहे.8 / 16तिसरी स्टेप - नवीन म्यूट व्हिडीओ फीचरचा वापर करण्यासाठी कोणताही व्हिडीओ रेकॉर्ड करा किंवा फोनमध्ये असलेला जुना रेकॉर्डेड व्हिडीओ एडिट करा.9 / 16चौथी स्टेप - ज्यावेळी तुम्ही एडीट स्क्रीनवर जाल. त्यावेळी सर्वात वरच्या कोपऱ्यातील व्हॅल्यूमवरील आयकॉन दिसेल. यावर टॅप करून व्हिडीओ म्यूट होईल. यानंतर व्हिडीओला आपल्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करता येईल. स्टेट्स म्हणून सेट करू शकता.10 / 16इन्स्टाग्रामवर हे फीचर आधीच उपलब्ध आहे. WhatsApp Mute Video फीचर केवळ अँड्रॉईड युजर्संसाठी उपलब्ध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 16सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअॅप युजर्सला अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअॅप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे.12 / 16हॅकर्सनी व्हॉट्सअॅप अकाऊंटचा अॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सअॅप रन करू शकतात.13 / 16स्कॅमचा, फसवणूकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाऊसनेही केला होता. त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात.14 / 16व्हॉट्सअॅप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतं. 15 / 16व्हॉट्सअॅप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतं. 16 / 16व्हॉट्सअॅप युजर्सना आकर्षित करण्यासाठी आता नवनवीन भन्नाट फीचर्स आणत आहे. असंच एक हटके फीचर पुन्हा एकदा आणलं असून याचा मोठा फायदा हा आता युजर्सना होणार आहे. फेसबुकप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही लॉग आऊट करता येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications