शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वर लवकरच Camera शी संबंधित नवीन फीचर येणार; जाणून घ्या काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:41 PM

1 / 6
WhatsApp ने टेस्ट फ्लाइट बीटा प्रोग्राममध्ये नवीन व्हर्जन 2.22.19.75 जोडले आहे. WhatsApp नवीन कॅमेरा शॉर्टकट फीचरवर काम करत आहे. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. WABetaInfo ने ट्विटर पोस्टमध्ये आपला ब्लॉग शेअर केला आहे.
2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी फीचरचे नाव 'Camera Shortcut' असे सांगण्यात आले आहे. अॅपचा नवीन कॅमेरा टॅब शॉर्टकट iOS बीटा अॅपच्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असल्याचेही सांगण्यात आले आहे.
3 / 6
चांगली गोष्ट म्हणजे WABetaInfoने त्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामुळे हे नवीन फीचर कसे असेल ते पाहता येईल. हे अँड्रॉइड बीटा वर दिले होते तसेच दिसते. मात्र, एका बगमुळे अपडेटनंतर ते काढून टाकण्यात आले. त्याचे स्टेबल व्हर्जन केव्हा सादर केले जाईल याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही.
4 / 6
याशिवाय, अशीही माहिती मिळाली आहे की व्हॉट्सअॅप लवकरच असे फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जेणेकरुन यूजर्स 'डेट' द्वारे मेसेज सर्च करू शकतील. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने TestFlight बीटा प्रोग्रामद्वारे अपडेट सबमिट केले आहे.
5 / 6
यावरून असे समजले आहे की, अॅप 22.19.0.73 व्हर्जनमध्ये डेट-टू-मेसेज सर्च फीचरवर काम करत आहे. WABetaInfo ने या फीचरला 'Search message by Date' असे नाव दिले आहे.
6 / 6
हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर असल्याचे देखील कळले आहे आणि आगामी अपडेट्समध्ये ते लवकरच सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान