शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वर ग्रुप्सना असणार एक्सपायरी डेट; काम होताच आपोआप होईल डिलीट, जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 4:02 PM

1 / 10
WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स येत असतात. यामुळे चॅटिंगची गंमत आणखी वाढते. WhatsApp वर यावर्षी अनेक नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत.
2 / 10
कंपनी एकाच वेळी अनेक फीचर्सवर काम करत आहे, जे लवकरच आणले जाणार आहेत. काही फीचर्स आधी iOS बीटा व्हर्जनवर येतील आणि काही अँड्रॉइड व्हर्जनवर आधी सादर केले जातील. अशातच आता भन्नाट फीचर येणार आहे.
3 / 10
WhatsApp iOS बीटा साठी एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. युजर्सना ग्रुप्ससाठी एक्सपायरी डेट सेट करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. Wabetainfo च्या ताज्या अहवालानुसार, नवीन पर्याय Group Info मध्ये उपलब्ध असेल.
4 / 10
जेव्हा हे फीचर जारी केले जाईल, तेव्हा युजर एक दिवस, एक आठवडा किंवा एखादी हवी असलेली तारीख यासारख्या विविध पर्यायांमधून एकाची निवड करण्यास सक्षम असतील. शिवाय, जर युजर्सचा विचार बदलला तर ते आधी सेट केलेली एक्सपायरी तारीख बदलू किंवा हटवू शकतील.
5 / 10
हा ऑप्शन वैयक्तिक असेल आणि ग्रुपमधील इतर लोकांना लागू होणार नाही. हे फीचर चांगला स्टोरेज टूल म्हणून काम करणार आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, एक्सपायरी डेट निवडण्याची क्षमता भविष्यातील अपडेटमध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
6 / 10
दरम्यान, गेल्या आठवड्यात, मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS वर एक स्टिकर मेकर टूल रिलीझ करत असल्याची बातमी आली होती जी युजर्सना फोटो स्टिकर्समध्ये रूपांतरित करण्यास अनुमती देईल, स्टिकर्स तयार करण्यासाठी थर्ड पार्टी एपची आवश्यकता दूर करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 10
सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल किंवा मेसेज करून ऑनलाइन स्पॅमर्स आता युजर्सची फसवणूक करत आहेत. अशा बनावट कॉल्सला रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सायलेन्स अननोन कॉलर्स फीचर आणणार आहे.
8 / 10
ज्यामध्ये यूजर्स अनोळखी नंबरवरून येणारे कॉल म्यूट करू शकतील. अलीकडेच हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर यूजर्सला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सपासून वाचवू शकते. हे फिचर अज्ञात नंबरवरून येणारे कॉल म्यूट करतं.
9 / 10
तुम्ही नोटिफिकेशन सेंटर आणि कॉल टॅबमध्ये हे म्यूट कॉल पाहू शकाल. याच्या मदतीने कोणी फोन केला होता हे कळू शकणार आहे. या फीचरच्या मदतीने फ्रॉड कॉल आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासूनही सुटका होणार आहे.
10 / 10
रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये 'सायलेन्स अननोन कॉलर्स'चा पर्याय उपलब्ध असेल. यूझर्स ते सुरू करून फ्रॉड कॉल्सपासून मुक्त होऊ शकतात. या फीचरमुळे प्रँक, स्पॅम आणि त्रासदायक कॉल्स थांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, या नवीन फीचरच्या मदतीने यूझर्सना खूप फायदा होणार आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप