शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 2:58 PM

1 / 6
व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी सातत्याने फीचर्स आणत असतं. WhatsApp चॅटींगची गंमत आणखी वाढणार आहे कारण लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर धमाकेदार फीचर्स येणार आहेत. या फीचर्सबाबत जाणून घेऊया.
2 / 6
ऑनलाईन स्टेटस हाईड फीचरच्या मदतीने युजर्स लास्ट सीन, रीड आणि रिसिप्टसारखे फीचर्स कंट्रोल करू शकतो. ऑनलाईन स्टेटस हाईड केल्यावर दुसऱ्या युजर्सना ते दिसणार नाही.
3 / 6
व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या वर्षी भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंटचं टेस्टिंग सुरू केले आहे. हे फीचर लवकरच सर्वांसाठी येणार आहे. पैशाचे व्यवहार करणे या फीचरमुळे सोपे होणार आहे.
4 / 6
व्हॉट्सअ‍ॅपने रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून अ‍ॅपने डार्क मोड फीचर आणले आहे. सध्या या फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे.
5 / 6
व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेअर केल्यावर ऑटोमॅटीक फोटोचं रेजोल्यूशन कमी होतं. ज्यामध्ये मोठ्या आकाराच्या फोटोची क्वालिटी कमी होते. मात्र नवीन फीचर आल्यावर रेजोल्यूशन कमी न करता मोठ्या साईजमध्ये फोटो शेअर करता येणार आहेत.
6 / 6
व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या बॅकअपची सुविधा देतं तसेच डिव्हाईस बदलल्यानंतर ते सुरक्षित ठेवलं जातं.
टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान