शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे व्वा! WhatsApp मध्ये 'हे' कमाल फीचर येणार, Facebook प्रमाणे Log Out होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 11:43 AM

1 / 15
व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत, बदलल्या आहेत. सुरुवातीच्या काळात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी टेक्स्ट मेसेज होते. मात्र आता इंटरनेटमुळे खूप गोष्टी सहज शक्य होत आहेत. 
2 / 15
इंस्टेंट मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे मेसेज पाठवण्याची पद्धतच बदलली. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत आलं होतं. 
3 / 15
व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आकर्षित करण्यासाठी आता नवनवीन भन्नाट फीचर्स आणत आहे. असंच एक हटके फीचर पुन्हा एकदा आणलं असून याचा मोठा फायदा हा आता युजर्सना होणार आहे. फेसबुकप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवरही लॉग आऊट करता येणार आहे. 
4 / 15
सोशल मीडिया साईट फेसबुक आदीमध्ये आपण ऑनलाईन येण्यासाठी लॉगिन करतो आणि ऑफलाईन जाण्यासाठी लॉग आऊट करतो. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील अशी सुविधा लवकरच येणार आहे.
5 / 15
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आपण नेहमीसाठी लॉगिन राहतो. फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल तर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येऊ शकतात. त्यावर काहीही बंधन नाही. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपपासून लोकांना ब्रेक देण्यासाठी हे नवीन फीचर येत आहे.
6 / 15
मिळालेल्या माहितीनुसार, युजर्संला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच एक नवीन लॉग आऊट फीचर मिळणार आहे. या फीचर्सची अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व युजर्संना फोनमध्ये इंटरनेट सुविधा असल्यास 24 तास अ‍ॅक्टिव्ह राहतात. 
7 / 15
लागोपाठ मेसेज आल्यानंतर फोनवर लक्ष जाते. इंटरनेट बंद असल्यानंतर मेसेज येत नाही. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट अकाउंटचा पर्याय हटवला जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनमध्ये नवीन लॉग आऊट फीचरला समावेश करण्यात आला आहे. 
8 / 15
व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन लॉग आऊट फीचर व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस व्हर्जनमध्ये दिले आहे. हे अ‍ॅप युजर आणि अँड्रॉयड युजर्स दोन्हींना मिळणार आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 
9 / 15
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा चार ठिकणी वापर करता येणार आहे. मल्टी डिव्हाईस असं या फीचरचं नाव असून हे युजर्ससाठी येत्या काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
10 / 15
मल्टी डिव्हाईस फीचर अंतर्गत एकाच अकाऊंटला अनेक डिव्हाईस म्हणजे अनेक ठिकाणी अ‍ॅक्सेस मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स गेल्या काही दिवसांपासून या हटके फीचरची वाट पाहत होते.
11 / 15
व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक डिव्हाईसवर एका अकाऊंटचा वापर करण्यात येणार आहे. या मल्टी डिव्हाईस सपोर्टचा एक भाग एक फीचरच्या रुपात स्पॉट करण्यात आले आहे.
12 / 15
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, iOS साठी WhatsApp बीटा 2.21.30.16 मध्ये एक लॉगआऊट फीचर दिसलं आहे. हे फीचर मल्टी डिव्हाईस सपोर्टचा भाग असणार आहे. या द्वारे एक व्यक्ती विविध ठिकाणी कनेक्टेड डिव्हाईसशी लॉगआऊट करू शकणार आहे.
13 / 15
नवीन सर्व्हिसवरून एक व्हिडीओ डेमो दाखवला आहे. हे लिंक्ड डिव्हाईस इंटरफेसमध्ये देण्यात आलेल्या डिलीट अकाऊंट पर्यायाला रिप्लेस करू शकतो. फायदा असल्याने हे फीचर युजर्सच्या पसंतीस पडू शकतं.
14 / 15
या फीचरचा वापर करण्यासाठी ही सर्व्हिस युजर्स त्यांच्या अकाऊंटला दुसऱ्या डिव्हाईसला लॉगआऊट करण्यास मदत करू शकणार आहे. रिपोर्टमध्ये एकाच अकाऊंटला चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये अ‍ॅक्सेस केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे.
15 / 15
ही मर्यादा पुढे जाऊन कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. या फीचरसाठी प्रायमरी डिव्हाईसवर इंटरनेट कनेक्शनची गरज नसणार आहे. त्यामुळे लॉगआऊट फीचरद्वारे युजर्स अकाऊंटला वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये लॉगआऊट करू शकतील.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन