whatsapp new privacy policy may force users to stop using app know details
WhatsApp चं टेन्शन वाढलं, बसला मोठा झटका; 28 टक्के युजर्स बंद करणार App चा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 12:14 PM1 / 15व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी व्हॉट्सअॅपचा धसका घेतलेला पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.2 / 15नव्या पॉलिसीचा सर्वाधिक फटका हा त्यामुळे व्हॉट्सअॅपलाच बसला आहे. व्हॉट्सअॅपला पर्याय असलेल्या तसेच युजर्सच्या सुरक्षितच्या दृष्टीने योग्य असलेल्या आणि वापरायला अत्यंत सोप्या असलेल्या अॅपचा शोध सर्वच जण घेत आहे. 3 / 15व्हॉट्सअॅपला मोठा झटका बसला असून टेलिग्राम, सिग्नलसारख्या अॅपचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची तसेच वापरणाऱ्यांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे.4 / 15सायबर मीडिया रिसर्चच्या एका सर्व्हेनुसार, 28 टक्के युजर्स आता व्हॉट्सअॅपचा वापर बंद करणार असल्याच्या विचारात आहेत. तर 79 टक्के युजर्स असे आहेत ज्यांनी अजून यासंबंधी विचार केलेला नाही. 5 / 15व्हॉट्सअॅप आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू करणार होतं. मात्र सध्या हे काही महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. युजर्संकडून मिळालेल्या निगेटिव्ह रिस्पॉन्समुळे कंपनीला आपली पॉलिसी मे 2021 पर्यंत पुढे ढकलावी लागली आहे. 6 / 15कंपनी युजर्संना या दरम्यान पॉलिसीसंबंधी अधिक चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन पॉलिसीला लागू करण्याच्या तारखेचा निर्णय कंपनीला फायदेशीर ठऱला आहे. अन्यथा अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याच्या विचारात होते.7 / 15व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीमुळे युजर्संमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 49 टक्के युजर्स यावरून नाराज झाले आहेत. तसेच 45 टक्के युजर्सने व्हॉट्सअॅप विश्वास ठेवला आहे. 35 टक्के युजर्सनी व्हॉट्सअॅपवर ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वास तोडल्याच म्हटलं आहे.8 / 15सायबर मीडियाच्या रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरहून जास्त युजर्स थर्ड पार्टी सर्व्हरवर स्टोर केले जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. 9 / 15रिसर्च फर्मच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरच्या 50 टक्के हून जास्त युजर्सला जवळपास रोज स्पॅम मेसेज येतात. सर्व्हेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये 50 टक्के अनोळखी नंबरवरून संदिग्ध मेसेज मिळत होते. यात फिशिंग अटॅक वायरसचे लिंक असल्याचं देखील म्हटलं आहे.10 / 15फिशिंग अटॅकसाठी व्हॉट्सअॅप हॅकर्सचे पसंतीचे प्लॅटफॉर्म आहे. सर्व्हेच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर फिशिंग अटॅकची शक्यता 52 टक्के आहे. तर टेलिग्राम साठी ही 28 टक्के आहे. सर्व्हेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये 41 टक्के टेलिग्राम आणि 35 टक्के युजर सिग्नलवर शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीबाबत युजर्समध्ये नाराजी असतानाच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपचं अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका असून चॅट लीक होऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे.12 / 15व्हॉट्सअॅपचे युजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना अॅप अनइन्स्टॉल नाही, तर डिलीट करावं लागेल. जर अकाऊंट डिलीट केलं नाही, तर डेटा व्हॉट्सअॅपकडे राहील. तसेच अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत युजर्सचा डेटा व्हॉट्सअॅपकडे राहतो.13 / 15व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स, दुसऱ्या मेसेजिंग अॅपकडे स्विच होत आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनमधून व्हॉट्सअॅप थेट अनइन्स्टॉल करत आहेत. मात्र हा योग्य पर्याय नाही. दुसऱ्या अॅपवर स्विच होताना व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करणं आवश्यक आहे.14 / 15अँड्रॉईड युजर्सला व्हॉट्सअॅपचे अकाउंट डिलीट करण्यासाठी मेन स्क्रिनवर बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये अकाऊंट ओपन करुन डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावं.15 / 15फोन नंबर टाकावा लागेल आणि नंतर डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करावं लागेल. यावेळी अकाऊंट डिलीट करण्याचं कारण विचारलं जाईल. यात कारण सांगून पुढील प्रोसेस होईल. एकदा अकाऊंट डिलीट झाल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत व्हॉट्सअॅपकडे युजर्सचा डेटा राहतो. आणखी वाचा Subscribe to Notifications