शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp : आता कमी प्रकाशातही व्हिडीओ कॉल करता येणार; WhatsApp आणणार नवीन फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 5:44 PM

1 / 8
WhatsApp : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलिंगसाठी एक नवीन फीचर आले आहे. हा लो-लाइट मोड व्हॉट्सॲपवर अधिक चांगला व्हिडीओ कॉलिंग अनुभव देईल. हे फीचर कमी लाईटमध्येही व्हिडीओ कॉलिंगमध्ये येणाऱ्या समस्या कमी करेल.
2 / 8
यासोबतच व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन फिल्टर्स आणि बॅकग्राउंड ऑप्शनचाही समावेश करण्यात आला आहे.
3 / 8
वापरकर्त्यांना कमी-प्रकाश परिस्थितीत व्हिडीओ कॉलिंगच्या वेळी स्पष्ट दिसण्यासाठी मदत देते. एकूणच, व्हॉट्सॲपचे हे फीचर अंधुक प्रकाशात चांगल्या स्पष्टतेसह व्हिडीओ कॉलिंग देते.
4 / 8
Meta च्या मेसेजिंग ॲप WhatsApp वर व्हिडीओ कॉलची स्पष्टता सुधारण्यासाठी लो-लाइट मोड फीचर देण्यात आले आहे. हे फीचर व्हॉट्सॲपमध्ये काही दिवसापूर्वीच दिले आहे.यामध्ये फिल्टर जोडले आहेत. कमी प्रकाशात वापरकर्त्यांना चांगला व्हिडीओ गुणवत्ता देण्यासाठी कंपनीने लो-लाइट मोड डिझाइन केले आहे, हे व्हिडिओमधील चमक तसेच ग्रेनेस कमी करण्यास मदत करते.
5 / 8
या फीचरच्या मदतीने, वापरकर्ते कमी प्रकाश असलेल्या भागातही अधिक स्पष्टतेसह त्यांचे मित्र आणि कुटुंबासह व्हिडीओ कॉल करण्यास सक्षम असतील.
6 / 8
WhatsApp चा लो-लाइट मोड सुरू करणे अगदी सोपे आहे, हे कमी प्रकाशात चांगल्या व्हिडीओ कॉलिंगसाठी आणले आहे. हे फीचर सुरू करण्यासाठी, वापरकर्त्यांना फक्त टॉगल प्रेस करावे लागेल.
7 / 8
पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवरून व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या व्हिडीओ फीडवर क्लिक करावे लागेल आणि ते पूर्ण स्क्रीनवर उघडावे लागेल. तुम्ही वरील बल्ब आयकॉनवर क्लिक करून लो-लाइट मोड सुरू करु शकता.
8 / 8
तुम्ही हा बल्ब त्याच्या आयकॉनवर क्लिक करून अक्षम देखील करू शकता. व्हॉट्सॲपचे हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. फीचर आता डेस्कटॉप व्हर्जनसाठी उपलब्ध नाही. यासोबतच यूजर्सला प्रत्येक कॉलसाठी हे फीचर सुरू करावे लागेल.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान