शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp आलं नवीन पॉवरफुल फीचर, सहज फोटो अन् व्हिडिओ निवडू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 3:35 PM

1 / 7
व्हॉट्सॲप (WhatsApp) हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, याचा वापर जगभरातील लाखो लोक करतात. लोक आपला मित्र आणि नातेवाईकांसोबत चॅट करण्यासाठी, ऑडिओ-व्हिडिओ फाइल्स शेअर करण्यासाठी किंवा ऑडिओ-व्हिडिओ कॉल करण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापरतात.
2 / 7
या ॲपमध्ये अशी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, जी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. कंपनी आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणते. आता कंपनीने अँड्राईड युजर्ससाठी नवीन अल्बम पिकर फीचर आणलं आहे.
3 / 7
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने यूजर्स आता फोटो आणि व्हिडिओ सहज निवडू शकतील. हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या फीचरबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
4 / 7
सध्या हे फीचर व्हॉट्सॲपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. या नवीन फीचरमुळे यूजर्सना फोटो आणि व्हिडिओ निवडणं सोपं होणार आहे. यापूर्वी, युजर्सना गॅलरी टॅबद्वारे वेगवेगळे अल्बम उघडावे लागत होते, परंतु आता नवीन अपडेटनंतर गॅलरी इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहेत.
5 / 7
आता युजर्स अल्बम टायटल व्ह्यूमध्ये सेलेक्टरच्या मदतीने थेट अल्बम निवडण्यास सक्षम असतील. व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे यूजर्सना फोटो आणि व्हिडिओ शेअर करणं अधिक सोपं होणार आहे. याशिवाय गॅलरीचा नवा लूकही चांगला आहे.
6 / 7
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (IOC) भारतीय चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. ऑलिम्पिक समितीनं भारतात 'ऑलिपिक खेल' (Olypic Khel) नावाचं व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलं आहे.
7 / 7
या चॅनलद्वारे चाहत्यांना ऑलिम्पिक खेळांशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. यासोबतच चाहत्यांना खास कंटेंट, लाइव्ह अपडेट्स, ऑलिम्पिक ट्रिव्हिया आणि भारतीय खेळाडूंचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतील.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप