whatsapp safety tips always keep these 5 things in mind whatsapp account will not be hacked
बापरे! WhatsApp अकाऊंटही होतंय हॅक पण घेऊ नका टेन्शन; 'या' सोप्या टिप्सने असा करा बचाव By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 7:02 PM1 / 10व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून ते सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑफिसपासून ते खासगी गोष्टीपर्यंत सर्वकाही य़ाद्वारे शेअर केल्या जातात. 2 / 10महत्वाचे फोटो, व्हिडीओ, फाईल्स देखील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवता येतात. मात्र, WhatsApp वापरताना काही गोष्टींची अत्यंत काळजी घेणं गरजेचे आहे, जेणेकरून तुमचं अकाऊंट हे हॅक होणार नाही.3 / 10व्हॉट्सअॅप युजर्सने नेहमीच टू-स्टेप व्हेरिफिकेशन्स ऑन ठेवले पाहिजे. यामुळे अतिरिक्त सुरक्षा मिळते, जे तुमच्या अकाऊंटला हॅक होण्यापासून प्रामुख्याने वाचवतं. 4 / 10युजर्सला यासाठी WhatsApp च्या सेटिंग्समध्ये जाऊन Account पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Two Step Verification पर्यायावर क्लिक करून पासवर्ड टाकावा लागेल.5 / 10व्हॉट्सअॅपमध्ये हे एक महत्त्वाचे फीचर आहे. यामध्ये इतर डिव्हाइसमध्ये अथवा दुसऱ्या फोनमध्ये लॉग इन केल्यास तुम्हाला त्वरित अलर्ट करणारा एक मेसेज येतो. व्हॉट्सअॅप युजर्सला यासाठी सिक्योरिटी कोडची परवानगी देतो. 6 / 10युजर्सला Show Security Notifications पर्याय सुरू ठेवावा लागणार आहे. यासाठी WhatsApp Setting च्या Account पर्यायावर टॅप करा. आता Security पर्याय निवडा. त्यानंतर Show Security Notifications पर्यायावर क्लिक करा.7 / 10WhatsApp वर कोणाशीही बोलताना खासगी माहिती जसे की पत्ता, फोन नंबर, ई-मेल आणि बँक डिटेल शेअर करू नये. सोबतच, सिक्योरिटी कोड, क्रेडिट कार्डची माहिती व पासवर्ड देखील सांगू नये.8 / 10WhatsApp मध्ये महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे कोणीही अकाऊंट अॅक्सेस करू शकता. अशा स्थितीत तुम्ही अॅपला पासवर्ड अथवा पिनने सुरक्षित करू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपची मदत घेता येईल.9 / 10जर तुमचा स्मार्टफोन अचानक हरवला अथवा चोरीला गेला आणि त्यामध्ये तुमचं अकाऊंट लॉग इन असेल तर लगेचच तुमच्या नेटवर्क प्रोव्हाइडरच्या मदतीने सिम-लॉक करा. तसेच त्वरित फोन नंबरने दुसऱ्या फोनमध्ये WhatsApp लॉग इन करा. 10 / 10असं केल्याने जुन्या फोनमध्ये WhatsApp वापरणं रोखू शकता. वारंवार असं केल्यास तुमचं अकाऊंट हे बंद होईल. याशिवाय देखील WhatsApp मध्ये अनेक दमदार फीचर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications