शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 4:08 PM

1 / 7
WhatsApp हे मेसेजिंग अ‍ॅप युजर्सचं चॅट मजेशीर करण्यासाठी सातत्याने नवनवीन भन्नाट फिचर्स आणत असतं. काही महिन्यांपूर्वी WhatsApp ने ग्रुप कॉलिंग हे फिचर आणलं होतं. मात्र ग्रुप कॉलिंग आता आणखी सोपं होणार आहे कारण युजर्ससाठी त्यामध्ये एक अपडेट देण्यात आले आहे.
2 / 7
WhatsApp ग्रुप कॉलिंगमधील या नव्या अपडेटमध्ये ग्रुप चॅटमध्ये एक कॉल बटण देण्यात आले आहे. अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी हे फीचर जारी करण्यात आले असून आयफोन युजर्ससाठी हे फीचर गेल्या महिन्यापासून उपलब्ध आहे.
3 / 7
WhatsApp ने ऑगस्ट 2018 मध्ये ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर युजर्ससाठी आणलं. मात्र याची प्रोसेस थोडी गुंतागुंतीची होती. मात्र आता ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसाठी एक बटण अ‍ॅड केल्यामुळे ही प्रोसेस आणखी सोपी होणार आहे.
4 / 7
WhatsApp ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी चार WhatsApp युजर्स व्हिडीओ चॅट करू शकतात. WhatsApp ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात करण्यासाठी युजरला एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल करावा लागेल. यानंतर तुम्ही आणखी दोघांना कॉलमध्ये अ‍ॅड करु शकता अशी प्रक्रिया सध्या आहे.
5 / 7
WhatsApp वरील नव्या ग्रुप कॉल बटणामुळे कॉल करायचे आहेत त्या सर्वांना एकाचवेळी अ‍ॅड करता येणार आहे. WhatsApp व्हर्जन 2.19.9 हे अपडेट झाल्यानंतर हे फीचर मिळणार आहे. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे.
6 / 7
WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येतो. हे फीचर Android आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.
7 / 7
2019 या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान