शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp Trick : WhatsApp न उघडता पाठवा मेसेज; शानदार आहे 'ही' शॉर्टकट पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:42 AM

1 / 6
व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. यामागेही एक कारण आहे. यामध्ये अनेक शानदार फीचर्सही देण्यात आले आहेत. युजर्ससाठी व्हॉट्सअॅप हे सतत नव-नवीन फीचर्स जारी करते. पण, लोकांना व्हॉट्सअॅपच्या अनेक फीचर्सबद्दल माहिती देखील नसते.
2 / 6
यामध्ये एक फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही व्हॉट्सअॅप न उघडताही मेसेज पाठवू शकता. यासाठी पद्धत खूपच सोपी आहे. मात्र, बऱ्याच लोकांना हे देखील माहित असेल. परंतु, अनेक युजर्सना याची माहिती नसते.
3 / 6
व्हॉट्सअॅपच्या या ट्रिकसाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. ही ट्रिक तुम्ही Android फोनवर वापरू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल. यासाठी ज्याच्यासोबत तुम्ही जास्त बोलता, ते चॅट ओपन करावे लागेल.
4 / 6
यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला मोअरच्या (More) ऑप्शनवर जावे लागेल. येथे तुम्हाला अॅड शॉर्टकटचा (Add Shortcut) ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. हे होम स्क्रीनवर या चॅटचा शॉर्टकट दर्शवेल.
5 / 6
अशा प्रकारे तुम्ही होम स्क्रीनवरील उर्वरित चॅटमध्ये शॉर्टकट देखील जोडू शकता, ज्यांना तुम्हाला थेट उत्तर द्यायचे आहे. याच्या मदतीने तुम्ही त्यावर थेट टॅप करून चॅट बॉक्समध्ये पोहोचू शकता. म्हणजेच अॅप ओपन करून चॅट उघडण्याची गरज भासणार नाही.
6 / 6
तुम्हाला अॅप न उघडता थेट रिप्लाय द्यायचा असल्यास तुम्ही नोटिफिकेशन पॅनलमधूनही देऊ शकता. मात्र, नोटिफिकेशन पॅनेलमधून केवळ टेक्स्ट रिप्लाय पाठवू शकतात. फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी तुम्हाला चॅट स्क्रीन उघडावी लागेल.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान