Whatsapp trick how to use Whatsapp without phone number check process
आता प्रायव्हसीची चिंता सोडा, फोन नंबर न वापरता असं चालवा WhatsApp By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 03, 2021 12:49 PM1 / 13नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर अनेक व्हॉट्सअॅप (WhatsApp) युझर्स व्हॉट्सअॅप सोडताना दिसत आहेत. व्हॉट्सअॅपवरील आपल्या प्रायव्हेट डेटाच्या शेअरिंगसंदर्भात लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 / 13आज आम्ही आपल्याला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, जिच्या सहाय्याने आपण आपला पर्सनल नंबर शेअर न करता व्हॉट्सअॅपचा वापर करू शकाल.3 / 13यासाठी आपल्याला एका व्हर्च्युअल नंबरची आवश्कता असेल. 4 / 13वर्च्युअल फोन नंबरसाठी TextNow अॅप्लीकेशन हा एक चांगला पर्याय आहे. 5 / 13TextNow वरून नंबर मिळवण्यासाठी आपल्याला हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.6 / 13व्हर्च्युअल नंबरसाठी आपल्याला सर्वप्रथम TextNow वर एक फ्री अकाउंट तयार करावे लागेल. यावर लॉग-इन केल्यानंतर आपल्याला US आणि कॅनडा तील 5 फ्री फोन नंबरची एक यादी मिळेल. 7 / 13या फ्री नंबरपैकी आपल्याला कुठलाही एक नंबर निवडायचा आहे. या व्हर्च्युअल नंबरच्या सहाय्याने आपण कॉलही करू शकता तसेच इंटरनेटवर मेसेजदेखील पाठवू अथवा मिळवू शकता.8 / 13पर्सनल नंबर न वापरता चालवा WhatsApp - आता WhatsApp आपल्या फोनमध्ये डाउनलोड करा. जर आधीपासूनच आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाउनलोड असेल, तर ते आपल्याला सर्वप्रथम अनइंस्टॉल करावे लागेल. 9 / 13व्हॉट्सअॅपवर रजिस्ट्रेशन करताना, आपण निवडलेल्या व्हर्च्युअल नंबरच्या आधारे, भारताचा STD कोड बदलून US अथवा कॅनडाचा STD कोड टाका. त्यानंतर आपला व्हर्च्युअल नंबर टाका. यावेळी TextNow अॅप बॅकग्राउंडला ओपन ठेवा.10 / 13महत्वाचे म्हणजे, या व्हर्च्युअल फोन नंबरवर आपल्याला OTP मिळणार नाही. OTP चा टायमिंग एक्सपायर होण्याची वाट बघा. यानंतर OTP साठी ‘Call me’ ऑप्शन सेलेक्ट करा.11 / 13आपल्याला TextNow अॅपवर मिस्ड कॉल मिळेल आणि TextNow अॅपमध्ये आपल्या व्हाईसमेलवर एक नवा मेसेज येईल. हा एक ऑडिओ मॅसेज असेल. यात आपल्याला आपला कोड सांगितला जाईल. 12 / 13यानंतर ओटीपी कोड टाकून पुढील प्रोसेस करा आणि आपला पर्सनल नंबर न वापरता व्हॉट्सअॅप चालवा.13 / 13व्हॉट्सअॅप आणखी वाचा Subscribe to Notifications