शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॉयफ्रेंडनं रागाच्या भरात WhatsApp वर केलंय Block? पटवण्यासाठी ही Trick वापरून स्वतःला करा Unblock

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 1:12 PM

1 / 8
आजकाल पार्टनर असो अथवा एखादा चांगला मित्र, यांच्याशी साधारणपणे वॉट्सअॅपवरूनच सर्व काही बोलले जाते. मात्र, अनेक वेळा, अशी परिस्थितीही येते, की पार्टनर अथवा मित्र, आपल्याला ब्लॉक (WhatsApp Block) करतात. यानंतर, आता संबंधित व्यक्तीसोबत कसे बोलायचे? स्वतःला कशा प्रकारे अनब्लॉक करायचे? आणि झालेले गैरसमज कशा पद्धतीने मिटवायचे? असे प्रश्न मनात येतात.
2 / 8
अशा परिस्थितीत, आपण ब्लॉक झालेले असतानाही, कशा प्रकारे संबंधित व्यक्तीला मेसेज करून बोलू शकता, अथवा स्वतःला अनब्लॉक करू शकतात. यासंदर्भात आम्ही आपल्याला सांगणार आहोत. तर जाणून घेऊयात काय आहे ही ट्रिक... (WhatsApp Tips And Tricks)
3 / 8
आधी ब्लॉक केले आहे की नाही, हे बघा - आपल्याला सर्वप्रथम समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, की नाही, हे बघावे लागेल. यासाठी आपल्याला आधी एक मेसेज पाठवावा लागेल. जर आपल्याकडून मेसेज सेंड झाला असेल, पण डबल टिक आली नसेल, तर संबंधित व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले आहे, असे समजून जा. यानंतरच, आपण स्वतःला अनब्लॉक करण्यासाठी याचा अवलंब करू शखतात. जाणून घ्या पद्धत...
4 / 8
Whatsapp वर अशा पद्धतीने करा स्वतःला Unblock - पार्टनरला पटवण्यासाठी आपल्याला आपले व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करावे लागेल. यानंतर ते पुन्हा इन्स्टॉल करून साइन अप करावे लागेल. यानंतर आपण अपोआप अनब्लॉक व्हाल. जर बोलणे फारच आवश्यक असेल, तरच अकाउंट डिलीट करा. कारण यामुळे आपले बॅकअपही उडू शकते.
5 / 8
6 स्टेप्सच्या सहाय्याने समजून घ्या ट्रिक - 1. सर्व प्रथम व्हॅट्सअॅप ओपन करा आणि सेटिंग्स ऑप्शनमध्ये जाऊन अकाउंटवर क्लिक करा. 2. आपल्याला येथे, डिलीट माय अकाउंट ऑप्शन दिसेल. यावर आपल्याला क्लिक करावे लागेल.
6 / 8
3. डिलीट माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर, आपल्याला येथे देशाच्या कोडसह आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. 4. ही स्टेप पूर्ण केल्यानंतर, आपल्याला पुन्हा एकदा डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावे लागेल.
7 / 8
5. यानंतर पुन्हा व्हॉट्सअॅप ओपन करा आणि पुन्हा अकाउंट क्रिएट करा. 6. यानंतर, आपण ज्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले होते, त्या व्यक्तीसोबत पुन्हा बोलू शकता.
8 / 8
दुसरी पद्धत - दुसऱ्या पद्धतीसाठी आपल्याला आपल्या मित्राची अथवा एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. त्या व्यक्तीला आपल्याला एक ग्रुप तयार करायला सांगावे लागेल. यानंतर, त्या व्यक्तीने ग्रुपमध्ये आपल्याला आणि ज्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले आहे, तिला अॅड केल्यानंतर, आपण जो मेसेज कराल, तो तिच्यापर्यंत (आपल्याला ब्लॉक केलेल्या व्यक्तीपर्यंत) पोहोचत जाईल. यानंतर, आपली बाजू समजल्यानंतर, कदाचित ती व्यक्ती आपल्याला पुन्हा एकदा अनब्लॉकही करू शकते.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया