whatsapp update ceo mark zuckerberg brings digital avatars for users
फेसबुक-इन्स्टाग्रामचे हे फीचर 'WhatsApp' वर आले, मार्क झुकरबर्गने दिली माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 11:12 AM1 / 7'WhatsApp नेहमी आपल्या फिचरमध्ये बदल करत असते. आता WhatsApp ने पुन्हा एकदा नवीन फीचर लाँच केले आहे. मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली आहे. WhatsAppच्या या फीचरमध्ये यूजर्स त्यांचा कस्टमाइज्ड डिजिटल अवतार तयार करू शकतात. व्हॉट्सअॅपचे हे फीचर फेसबुक आणि इंस्टाग्राम अॅप वापरकर्त्यांसाठी आधीच उपलब्ध आहे.2 / 7WhatsApp वापरकर्ते आपले कस्टमाइज डिजिटल अवतार कस्टमाइज करू शकतात. ते आउटफिट, हेअरस्टाईल आणि फेसिएल फिचर निवडू शकतात. नवीन व्हॉट्सअॅप अवतार प्रोफाईल फोटो म्हणूनही वापरता येईल.3 / 7WhatsApp वापरकर्त्यांना अवतार अॅक्शन आणि इमोशनसाठी 36 कस्टम स्टिकरमधून निवडण्याचा पर्याय असेल. अवतार तयार झाल्यानंतर, व्हॉट्सअॅप वापरकर्ते ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करू शकतात.4 / 7हेअरस्टाईल टेक्सचर, शेडिंग आणि इतर कस्टमायझेशन पर्याय यांसारख्या अनेक नवीन कार्यक्षमता यात जोडल्या जाणार आहेत. 5 / 7WhatsApp अवतार फीचर युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. पण, कंपनी ते टप्प्याटप्प्याने लाँच करणार आहे. हे फिचर सर्व उपकरणावर एकाच वेळी उपलब्ध होणार नाही.हे फिचर WhatsApp iOS आणि Android वर उपलब्ध होणार आहे. 6 / 7 हे फिचर वापरणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करून स्टिकर ऑप्शनवर जावे लागेल. अँड्रॉइडमध्ये यासाठी तुम्हाला चॅटबॉक्समधील इमोजी चिन्हावर टॅप करावे लागेल. 7 / 7यानंतर तुम्हाला अवतारांच्या पर्यायावर जाऊन नवीन अवतार तयार करावा लागेल. यामध्ये तुम्ही हेअर स्टाइल, फेशियल आणि इतर पर्याय कस्टमाइज करून अवतार तयार करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications