WhatsApp users must not do these 5 things by mistake, otherwise….
WhatsApp युजर्सनी चुकूनही करू नये 'या' 5 गोष्टी, अन्यथा.... By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 5:40 PM1 / 6नवी दिल्ली : सध्या क्वचितच अशी व्यक्ती असेल, जी व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरत नसेल. आजच्या काळात WhatsApp च्या माध्यमातून सर्व प्रकारची कामे होत आहेत. मात्र, WhatsApp वापरताना 'या' 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. असे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.2 / 6WhatsApp ने सर्व फॉरवर्डेड मेसेजसाठी एक लेबल तयार केले आहे आणि शेअर करण्यापूर्वी युजर्सला त्यांचा विचार करावा लागेल. मेसेजमध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही, हे युजर्सना माहीत नसेल किंवा मेसेजचा स्रोत माहीत नसेल, तर असा मेसेज फॉरवर्ड करू नये.3 / 6WhatsApp युजर्सला टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचरसह अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. यासाठी WhatsApp अकाउंट रीसेट आणि ऑथेंटिकेट करण्यासाठी 6 अंकी पिन आवश्यक आहे. सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा कोणीतरी फोन फोडल्यास हे अतिशय उपयुक्त फीचर आहे.4 / 6WhatsApp ने यूजर्सला अकाउंट ब्लॉक करण्याचा ऑप्शन दिला आहे. WhatsApp युजर्सना काही संशयास्पद मेसेज मिळाल्यास, WhatsApp युजर्स WhatsApp ला याची तक्रार करू शकतात. याशिवाय WhatsApp अशा मेसेजची तक्रार करू शकते. त्याचप्रमाणे जर कोणी तुम्हाला अनोळखी नंबरने त्रास देत असेल तर युजर्स अशा नंबरला ब्लॉक करू शकतात.5 / 6WhatsApp डिसअपियरिंग मेसेज फीचर प्रदान करते. युजर्सच्या पर्सनल आणि ग्रुप चॅटमधील मेसेज थोड्या वेळाने गायब होतात. युजर्स 'व्यू वन्स' फीचरच्या मदतीने त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतात, जे एकदा उघडले की चॅटमधून गायब होतात. WhatsApp वर स्क्रीनशॉट ऑप्शनला डिसएबल करण्याचा ऑप्शन देखील आहे.6 / 6WhatsApp युजर्स आपल्या ऑनलाइन प्रेझेंसला प्रायव्हेट करू शकतात. WhatsApp ने एक फीचर आणले आहे, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे निवडू शकता. तसेच, तुम्हाला कोण ऑनलाइन पाहू शकतो आणि कोण पाहू शकत नाही हे तुम्ही ठरवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications