शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp युजर्सवर होणार पैशांचा वर्षाव, फक्त 'हे' छोटेसे काम करावे लागेल; जाणून घ्या कसा मिळेल रिवॉर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 6:53 PM

1 / 8
व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच युजर्सना पैसे देणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये, पेमेंट सेवा वाढवण्यासाठी WhatsApp कॅशबॅक रिवॉर्ड्स जारी करणार आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरची टेस्टिंग करत होती.
2 / 8
आता बातमी येत आहे की, Google Pay आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सला टक्कर देण्यासाठी WhatsApp Payment वर लवकरच कॅशबॅक स्कीम सुरू केली जाऊ शकते.
3 / 8
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, भारतातील 100 मिलियन यूजर्सला पेमेंट सेवा प्रदान करण्यासाठी WhatsApp ला मंजुरी मिळाल्यानंतर ही कॅशबॅक स्कीम भारतीय युजर्ससाठी जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
4 / 8
रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp मे अखेरपर्यंत कॅशबॅक ऑफर लाँच करू शकते. यामध्ये यूजर्सना WhatsApp पेमेंट सेवेद्वारे फंड ट्रान्सफर केल्यास 33 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. म्हणजेच, यासाठी तुम्हाला WhatsApp UPI सेवा वापरून फंड ट्रान्सफर करावा लागेल.
5 / 8
WhatsApp पेमेंट सेवेचा वापर करून युजर्स आपल्या कॉन्टॅक्ट्सना मेसेंजर अॅपद्वारेच पैसे पाठवू शकतात. रिपोर्टमध्ये कंपनीच्या योजनेची माहिती असलेल्या एका सोर्सचा हवाला दिला आहे.
6 / 8
युजर्सला आकर्षित करण्यासाठी WhatsApp तीन ट्रान्सफरपर्यंत कॅशबॅक देईल. मात्र, ट्रान्सफर केल्या जाणार्‍या रकमेत फरक पडणार नाही. म्हणजेच, जर युजर्संनी 1 रुपया देखील ट्रान्सफर केला तर त्यांना कॅशबॅक दिला जाईल.
7 / 8
काउंटरपॉईंट रिसर्चचे (Counterpoint Research) उपाध्यक्ष नील शाह म्हणाले की, WhatsApp ची कॅशबॅक रक्कम खूपच कमी वाटू शकते, परंतु ते युजर्संना ही पेमेंट सेवा वापरण्यासाठी नक्कीच आकर्षित करेल. एक भारतीय युजर्स म्हणून, तुम्हाला मिळणारे पैसे तुम्ही सोडू शकत नाही.
8 / 8
न्यूज एजन्सी रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात, व्हॉट्सअॅपने सांगितले की कॅशबॅक ऑफर टप्प्याटप्प्याने जारी केली जाईल. यामुळे युजर्सला WhatsApp पेमेंटच्या पोटेंशियलला अनलॉक करण्यास मदत करेल. यानंतर Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सशी , WhatsApp ची स्पर्धा होईल.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान