By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 12:39 IST
1 / 6व्हॉट्सॲप युजर्स बऱ्याच दिवसांपासून WhatsApp Voice Note Transcripts ची वाट पाहत होते. अखेर हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी रोलआउट करण्यात आलं आहे. 2 / 6कंपनी युजर्सच्या सोयीची पूर्ण काळजी घेते, त्यामुळं व्हॉट्सॲप मोठ्याप्रमाणात लोकप्रिय झालं आहे. युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर आणली जातात, आता हे नवीन फीचर यूजर्ससाठी ॲपमध्ये अॅड करण्यात आलं आहे.3 / 6व्हॉट्सॲपवर व्हॉईस मेसेज पाठवण्याचं फीचर अशा लोकांना खूप आवडतं, ज्यांना टाइप करणं फारसं आवडत नाही. जर तुम्हालाही व्हॉट्सॲपवर येणारे सर्व व्हॉईस मेसेज ऐकावं लागत असेल तर आता यापुढे ते व्हॉइस मेसेज टेक्स्टमध्ये रूपांतरित करून वाचू शकता. 4 / 6हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर आहे, जे तुमच्यासाठी हे काम अगदी सहज करेल. तुम्हाला हे फीचर व्हॉट्सॲप चॅट्समध्ये मिळेल आणि तुम्ही व्हॉट्सॲप सेटिंग्जमधून हे फीचर सुरू करू शकता. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला हे फीचर चॅट्समध्ये व्हॉइस मेसेजच्या खाली दिसू लागेल.5 / 6या फीचरवर क्लिक करताच व्हॉट्सॲप तुमच्या सोयीसाठी टेक्स्ट फाइल डाउनलोड करेल. फाइलचा आकार सुमारे ९० एमबी असू शकतो, तुम्हाला फाइलच्या खालीच टेक्स्ट दिसू लागेल. गोपनीयता लक्षात घेऊन आणखी एक व्यवस्था करण्यात आली आहे आणि ती म्हणजे ही मजकूर फाईल कोणाशीही शेअर करता येणार नाही.6 / 6WhatsApp Transcribe Feature सध्या फोनसाठी काम करत आहे, याचा अर्थ तुम्ही सध्या वेब व्हर्जनवर या फीचरचा वापर करू शकणार नाही. याशिवाय, हे फीचर सुरुवातीला इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, हिंदी आणि रशियन अशा पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सॲपवरील तुमचे सर्व वैयक्तिक व्हॉइस मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत. मेसेज पाठवणारा आणि रिसीव्हरशिवाय कोणीही ऐकू शकत नाही, अगदी व्हॉट्सॲप सुद्धा नाही.