काही WhatsApp युजर्स आता ठरवू शकतात, त्यांचा DP कोणाला दिसणार आणि कोणाला नाही By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 1:22 PM
1 / 10 व्हॉट्सॲप (WhatsApp) युजर्सला निवडक लोकांना आपला प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि अबाऊट सेक्शनला हाइड करण्यासाठी एका फीचवर काम करत होते. आता एका नवीन रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपने हे फीचर Whatsapp Android बीटा युजर्ससाठी जारी केले आहे. 2 / 10 हे नवीन फीचर मिळवण्यासाठी यूजर्सना अँड्रॉइडच्या लेटेस्ट व्हॉट्सॲप बीटा व्हर्जन 2.21.23.14 वर अपग्रेड करावे लागेल. बीटा व्हर्जनमधील या नवीन फीचरसाठी यूजर्सला प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन इथे 'My Contacts Except'हा ऑप्शन सेलेक्ट करावा लागेल. 3 / 10 हा ऑप्शन युजर्सना WhatsApp प्रोफाइल पिक्चर, लास्ट सीन आणि अबाउट इन्फोसाठी मिळेल. सध्या, व्हॉट्सअॅप युजर्सला लास्ट सीन आणि अबाउट इन्फॉर्मेशनला सर्वांसाठी लपविण्याचा म्हणजेच हाइड करण्याचा किंवा फक्त कॉन्टॅक्टला शो करण्याचा ऑप्शन देत आहे. 4 / 10 ज्यावेळी नवीन ऑप्शन युजर्स सिलेक्ट करतील. सिलेक्ट केलेले कॉन्टॅक्ट्स तुमचे प्रोफाइल पिक्चर, लास्ट सीन आणि अबाउट इंफो पाहू शकणार नाहीत. मात्र, हे देखील लक्षात ठेवा की, तुम्ही एखाद्या कॉन्टॅक्ट्ससाठी लास्ट सीन बंद केल्यास, तुम्ही समोरच्या युजर्सचे लास्ट सीन देखील पाहू शकणार नाही. 5 / 10 सध्या, या फीचरला स्पेसिफिक बीटा युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे फीचर दिसत नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. 6 / 10 दरम्यान, व्हॉट्सॲप एका नवीन Community फीचरचीही चाचणी करत आहे. यामुळे अॅडमिन्स ग्रुपमध्ये सब-ग्रुप तयार करू शकतील. यासोबतच कंपनीने वेब व्हर्जनवर इमेज एडिटिंग आणि स्टिकर सजेशन सारखे फीचर्स देखील अॅड केले आहेत. 7 / 10 Community फीचरमुळे ग्रुप अॅडमिन्सला ग्रुपमध्ये अधिक पॉवर मिळेल. याच्या मदतीने ग्रुपमध्येही ग्रुप तयार करता येतात. Community फीचरला WhatsAp च्या लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.21.21.6 मध्ये पाहिले होते. XDA Developers ने याबाबत रिपोर्ट दिला आहे. 8 / 10 रिपोर्टनुसार, Community मध्ये लिंक किंवा क्यूआर (QR) कोडद्वारे निमंत्रण देण्याची व्यवस्था असू शकते. यामुळे दुसरे युजर्स यामध्ये ज्वाइन होऊन सहभागी होऊ शकतात. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, व्हॉट्सॲप युजर्स लिंकद्वारे Community ज्वाइन करू शकतात. 9 / 10 Community फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सॲप दुसरे मेसेजिंग प्लॅटफॉर्म जसे की Telegram आणि Signal या सारख्या अॅपमध्ये असलेले अंतर भरून काढायचे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली होती. यानंतर युजर्सनी हा प्लॅटफॉर्म सोडून इतर मेसेजिंग अॅप्सवर जाण्यास सुरुवात केली होती. 10 / 10 Community फीचरसह अॅडमिनजवळ ग्रुप्ससंबंधी अधिक कंट्रोल होऊ शकतो. यामुळे त्यांना Community मध्ये मेसेज करण्यासाठी एक चॅनेल मिळू शकते. तसेच अॅडमिनला Community मॅनेजर्ससारखे जास्त रोल्स दिले जाऊ शकतात. मात्र, याबाबत व्हॉट्सॲप कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आणखी वाचा