शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका रात्रीत जगाला हादरा देणारा लियांग वेनफेंग कोण? DeepSeek ने अमेरिकेपर्यंत खळबळ माजवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:02 IST

1 / 9
DeepSeek : चीनमध्ये AI स्टार्ट अप DeepSeek या कंपनीने अमेरिकेसह जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेनंतर आता याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपन्यांनी एका दिवसातच DeepSeek समोर गुडघे टेकले आहेत. मागच्या २४ तासापासून जगभरातील माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. सध्या जगभरातील AI क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व संपवणारा 'लियांग वेनफेंग'कोण आहे? या चर्चा सुरू आहेत.
2 / 9
४० वर्षीय लियांग वेनफेंग हे चिनी एआय स्टार्टअप डीपसीकचे संस्थापक आहेत. ते या कंपनीचे सीईओ देखील आहेत. त्यांचा जन्म चीनमधील झांजियांग शहरात झाला.
3 / 9
त्यांचे वडील प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. लियांग हे अतिशय साध्या कुटुंबातून येतात. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण देखील एका सामान्य शाळेत झाले, पण ते लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी होते. त्यांना शिकण्याची खूप आवड आहे. याच जिद्दीमुळे आज त्यांनी AI जगतात स्वत:चे स्थान पक्के केले आहे.
4 / 9
२०२१ मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चीनच्या अमेरिकन चिप्सच्या निर्यातीवर कडक कारवाई करण्याची तयारी करत होते, ३६ वर्षीय लियांग वेनफेंग अमेरिकन कंपनी एनव्हीडियाकडून हजारो ग्राफिक्स प्रोसेसर खरेदी करत होते. त्यांचे मित्र आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक ही खरेदी पाहून त्यांना हे लहरी आहेत म्हणून चिडवत होते. पण याच लहरी व्यक्तीने आज जगाला हादरा दिला आहे.
5 / 9
लियांग वेनफेंग याने या प्रोसेसरचा वापर करून अनेक एआय मॉडेल्स तयार केले. त्याने अनेक चिप क्लस्टर तयार केले आणि चार वर्षांनंतर २० जानेवारी २०२५ रोजी, लियांगने त्याच्या स्टार्टअप डीपसीकद्वारे एआय चॅटबॉट मॉडेल डीपसीक-R1 लाँच केले, यावेळी अमेरिकेलाही धक्का बसला.
6 / 9
२७ जानेवारीपर्यंत, त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात खळबळ उडवून दिली. अनेक अमेरिकन दिग्गज एआय कंपन्यांनी त्यांच्यापुढे गुडघे टेकले. लियांग यांनी हा चॅटबॉट तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले नाहीत तर ते अगदी कमी खर्चात शक्य करुन दाखवले.
7 / 9
ज्यावेळी त्यांचे मॉडेल जगभरात डाउनलोड होऊ लागले तेव्हा अमेरिकन बाजारपेठेत गोंधळ उडाला. डीपसीकने मेटा, गुगल, ओपनएआय या मोठ्या एआय कंपन्यांची झोप उडवली आहे.Nividia या कंपनीचे एकाच दिवसात शेअर्स १७ टक्क्यांनी घसरले. त्या कंपनीने एका दिवसात ६०० अब्ज डॉलर्स गमावले.
8 / 9
हे पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा खडबडून जागे झाले. त्यांनी अमेरिकन आयटी कंपन्यांना जागे होण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प म्हणाले, हे तंत्रज्ञान युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी आता स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी आता इशाराच दिला आहे.
9 / 9
सोमवारी 'DeepSeek' वर मोठा सायबर हल्ला झाला, यामुळे वापरकर्त्यांना साइटवर रजिस्टर करण्यात अडचणी आल्या.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सAmericaअमेरिकाchinaचीन