शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... म्हणून चोरीला गेलेले स्मार्टफोन परत मिळत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 4:04 PM

1 / 8
स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्याच जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. नवनवीन स्मार्टफोन अनेक जण वापरत असतात. मात्र महागडे फोन हे अनेकदा चोरी होतात.
2 / 8
स्मार्टफोन चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर अनेकदा काही फोन परत मिळतात. तर काही मिळत नाही. चोरीला गेलेले स्मार्टफोन परत का मिळत नाहीत याबाबत जाणून घेऊया.
3 / 8
इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी म्हणजेच IMEI हा एक 15 अंकी यूनिक नंबर असतो. तो नंबर प्रत्येक फोनमध्ये वेगवेगळा देण्यात आलेला असतो.
4 / 8
IMEI असून देखील बऱ्याचवेळा हरवलेला अथवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधण्यात अपयश येतं कारण चोरी करण्यात आलेल्या स्मार्टफोनचा IMEI नंबर काही मिनिटात बदलला जातो. त्यामुळे पोलिसांना देखील हा फोन शोधणं कठीण होतं.
5 / 8
IMEI नंबर कोणी बदलू शकत नाही असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते खरं नाही. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅकर्स पाच मिनिटात चोरलेल्या फोनचा IMEI बदलतात.
6 / 8
बाजारात विविध ब्रँडचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यातील अनेक स्मार्टफोनचा IMEI नंबर पटकन बदलता येणे शक्य आहे. IMEI नंबर बदलला गेल्याने ओरिजनल नंबर ट्रेस करणं शक्य होत नाही.
7 / 8
चोरी केलेल्या स्मार्टफोनचा पॅटर्न सर्वप्रथन अनलॉक केला जातो. त्यानंतर त्या फोनचा IMEI नंबर बदलला जातो.
8 / 8
IMEI नंबर बदलण्यासाठी हॅकर्स 500-700 रुपये घेतात. अशाप्रकारे चोरलेल्या स्मार्टफोनचा नंबर बदल्याने स्मार्टफोन शोधूनही परत मिळत नाहीत.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान