why is only 10 digit mobile number in country this is reason
भारतात कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो? जाणून घ्या, याबद्दल... By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 7:32 PM1 / 6सध्याच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल फोन असणे ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. ज्या दिवशी फोन खराब होतो किंवा नेट बंद होते, त्या दिवशी आयुष्यात काहीतरी चुकल्यासारखे वाटते. याच मोबाईलबाबत थोडी माहिती जाणून घेऊया...2 / 6आपल्या देशात मोबाईल नंबर (Mobile Number) फक्त 10 अंकांचाच (Digit) का असतो, याचा विचार तुम्ही केला आहे का? ही संख्या 8, 9 किंवा 11, 12 का नाही? शेवटी, सरकारने फक्त 10 अंक ठेवण्याचे कारण काय? तर जाणून घ्या सविस्तर...3 / 6भारतात 10 अंकी मोबाइल क्रमांकांच्या मागे सरकारची राष्ट्रीय क्रमांकन योजना (National Numbering Plan) आहे. देशाची प्रचंड लोकसंख्या आणि इतर अनेक बाबी लक्षात घेऊन सरकारने ही योजना लागू केली. जेणेकरून देशातील प्रत्येक मोबाईल फोन युजर्सला एक युनिक मोबाईल नंबर मिळू शकेल.4 / 6मिळालेल्या माहितीनुसार, देशात फक्त एक अंकी क्रमांक ठेवला तर फक्त 10 लोकांनाच क्रमांक मिळू शकतो. 2 अंकी क्रमांक 100 आणि 3 अंकी क्रमांक ठेवल्यास केवळ 1 हजार लोकांनाच युनिक मोबाईल क्रमांक मिळू शकतो. तसेच, 4 अंकी ठेवल्यास 10 हजार, 5 अंकी ठेवल्यास 1 लाख लोकांना क्रमांक मिळू शकतो. अशा परिस्थितीत देशाची मोठी लोकसंख्या लक्षात घेता सरकारने 9 अंकी क्रमांकाची मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला.5 / 6देशात 9 अंकी क्रमांकाची मालिका अनेक वर्षे सुरू होती. त्या काळात देशातील लोकांचे नंबर 9 अंकी होते. पुढे लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर त्यात बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर ते आकडे 10 अंकांवर आणण्यात आले. असे केल्याने देशात 1 हजार कोटी फोन नंबर तयार करता येऊ शकतात.6 / 6देशातील लोकसंख्या ज्यानुसार वाढत आहे. त्यात 10 अंक देखील कमी पडू शकतात. अशा स्थितीत, आगामी काळात, सरकार सध्याचा मोबाईल नंबर 11 अंकी एक करू शकते. मात्र, सध्या ट्रायने (TRAI) अशा कोणतीही घोषणा केली नाही. ट्रायने म्हटले आहे की देशातील सध्याच्या गरजांसाठी 10 अंक पुरेसे आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications