शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सॅमसंगचा नोट 9 का ठरतोय आयफोन X पेक्षा सरस...?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 6:10 PM

1 / 7
सॅमसंगने नुकताच लाँच केलेला गॅलॅक्सी नोट 9 हा महागड्या आयफोन X पेक्षा बऱ्याच बाबतीत सरस ठरला आहे. iphone X च्या तुलनेत किंमत तर कमी आहेच पण रॅम, आतील मेमरी आणि अन्य बाबतील नोट 9च आयफोन एक्स ला भारी पडणार आहे. चला पाहुया काय फिचर्स आहेत...
2 / 7
किंमत : आयफोन एक्सची किंमत 95 हजार रुपयांपासून 1.3 लाख रुपयांपर्यंत आहे. तर सॅमसंगच्या नोट 9 ची किंमत 68 हजारपासून सुरु होते. आयफोन एक्सचे 64 जीबीचे मॉडेल 95 हजार तर नोट 9च्या 4 जीबी रॅम, 128 जीबी अंतर्गत मेमरीच्या मॉडेलची किंमत 67,900 आहे.
3 / 7
स्क्रीन : सॅमसंगच्या नोट 9 मध्ये क्वाड एचडी प्लस रिझॉल्युशनसोबत 6.4 इंचाचा सुपर अमोल्ड इन्फिनिटी डिस्प्ले आहे. तर अॅपलच्या X मध्ये 1125x2436 पिक्सल रिझॉल्युशनसोबत 5.8 इंचाचा डिस्प्ले आहे.
4 / 7
कॅमेरा, रॅम : नोट 9 मध्ये एफ/1.7 अपार्चर सोबत 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा तर आयफोनमध्ये एफ/2.2 अपार्चर सोबत 7 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच नोट 9 च्या वरच्या मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि X मध्ये 3 जीबी रॅम दिली गेली आहे.
5 / 7
स्टोरेज : नोट 9 च्या वरच्या मॉडेमध्ये 512 जीबी मेमरी तर स्टेरेजही 512 जीबीने वाढवू शकतो. तर आयफोनमध्ये केवळ 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
6 / 7
बॅटरी : नोट 9 मध्ये 4000 एमएएचची बॅटरी तर आयफोनमध्ये 2716 एमएएचची बॅटरी दिली गेली आहे.
7 / 7
स्टायलस पेन : नोट 9 मध्ये ब्लुटुथद्वारे चालणारे पेन आहे. तर आयफोनमध्ये स्टायलस पेन नाही.
टॅग्स :samsungसॅमसंगApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X