why you are prohibited to carry power banks in flight check in baggage
विमान प्रवासात पावर बँक चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात? जाणून घ्या महत्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 4:45 PM1 / 8जर तुम्ही तुम्ही नियमित विमान प्रवास करत असाल तर तुम्हाला कधी तरी तुमच्या चेक इन बागेतील पावर बँक केबिन बॅगमध्ये ठेवण्यास सांगितली असेल. तुम्हाला या गोष्टीचा राग देखील आला असेल. 2 / 8कोणत्या गोष्टी विमान प्रवासात सोबत बाळगता येतात आणि कोणत्या नाही याची यादी एयरलाईन्सकडून दिली जाते. परंतु त्यामागील कारण मात्र सांगितले जात नाही. 3 / 8पावर बँक चेक-इन बॅग्समध्ये निषिद्ध आहे हे तुम्हाला माहित असेल, परंतु त्यामागील कारण माहित असण्याची शक्यता कमी असेल. जो डिवाइस केबिनमध्ये ठेवता येतो तो कार्गोमध्ये का ठेवता येत नाही, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. 4 / 8यामागे विमानाची सुरक्षा कारणीभूत आहे. पावर बँकमध्ये लिथियम सेल्सचा वापर केला जातो, जे पेट घेऊ शकतात. या आगीचं मोठ्या आगीत रूपांतर होऊ शकतं. 5 / 8जर पावर बँकनं कार्गोमध्ये पेट घेतला तर ती आग क्रू मेम्बर्सना समजणार नाही आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 6 / 8परंतु जर पावर बँक प्रवाश्याकडे असेल तर तिला लागलेली आग सहज लक्षात येईल. तसेच केबिनमधील अग्निशमन उपकरणांच्या मदतीनं ती विझवता येईल. 7 / 8क्ले किंवा तत्सम पदार्थांचा वापर करून बनवलेल्या काही पावर बँक्स स्कॅन केल्यावर बॉम्ब असल्यासारख्या भासतात. परंतु चांगल्या क्वॉलिटीच्या पावर बँक्समध्ये कोणतीही समस्या येत नाही, अशी माहिती सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्सनं हिंदुस्थान टाइम्सला दिली आहे. 8 / 8आता तुम्हाला पावर बँक्स चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात याचं उत्तर मिळालं असेल. पुढील वेळी विमान प्रवासाला जाताना ही काळजी घेतल्यास तुमचा वेळ वाचू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications