WiFi security: Home WiFi can make you miserable, follow these steps, otherwise big damage can happen
WiFi security: घरातील WiFi करू शकतो तुम्हाला कंगाल, या स्टेप्स फॉलो करा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 2:04 PM1 / 6आजच्या काळात सर्वसाधारणपणे सर्वांच्याच मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन असतं. मात्र घरांमध्ये बहुतांश लोक वायफायचा वापर करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली नाही तर फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. ते हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकते. त्यामुळे वायफाय सुरक्षित ठेवण्यासाठी खालील स्टेप्सचा अवलंब करता येऊ शकेल. 2 / 6एकदा तुम्ही घरामध्ये वायफाय लावले की सर्वप्रथम त्याचा पासवर्ड बदला. कारण कंपनीने दिलेला पासवर्ड हा खूपच बेसिक असतो. अशा परिस्थितीत वायफायच्या सेटअपनंतर तुम्ही एक कठीण पासवर्ड सेट केला पाहिजे. जो सहजपणे हॅक करता येणार नाही.3 / 6हॅकिंग आणि व्हायरसपासून वाचण्यासाठी पासवर्डसोबत आपल्या नेटवर्कचं नावही बदलून घ्या. नेटवर्कला एक नवे नाव म्हणजेच एसएसआयडी द्या, जे तुमचे नाव, तुमचे लोकेशन किंवा अन्य माहितीप्रमाणे नसेल. 4 / 6डिफॉल्ट सेटिंगमुळे अनेकदा तुमचा वायफाय राऊटर हा हार्ड ड्राइव्हला इंटरनेटशी कनेक्ट करण्याची परवानगी देतो. त्याला रिमोट अॅक्सेस म्हणतात. त्यामुळे वायफायच्या सेटिंगमध्ये जाऊन रिमोट अॅक्सेस बंद करा. कारण तो व्हायरस अॅटॅकचे एक मोठे कारण ठरू शकतात. 5 / 6ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरला वेळोवेळी अपडेट करता आपल्या वायफाय राऊटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमलाही अपडेट केलं पाहिजे. नव्या अपडेट्समुळे तुमच्या वायफायला एक नवे सिक्युरिटी अपडेट आणि फिचर्स मिळतात. ते तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात. जर तुम्हाला वाटले तर ऑटोमेटिक अपडेट्सचा ऑप्शनही ऑन करू शकता.6 / 6 तुम्ही तुमच्या वायफायला प्रत्येकवेळी सुरू ठेवावे हे काही आवश्यक नाही. जेव्हा तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता नसेल, जेव्हा तुम्ही झोपायला जाल, किंवा घराबाहेर असाल तेव्हा वायफाय अवश्य बंद करा. त्याचप्रकारे तुम्ही हॅकर्स आणि व्हायरसच्या हल्ल्यामध्येही सुरक्षित राहाल. आणखी वाचा Subscribe to Notifications