शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाओमीने आणला स्मार्ट देशाचा स्मार्टफोन; स्वस्तातला Redmi 7A लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:26 PM

1 / 7
चीनची कंपनी Xiaomi ने भारतात स्वस्तातला स्मार्टफोन Redmi 7A लाँच केला आहे. या फोनची सुरूवातीची किंमत 5999 रुपयांपासून असून 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची ही किंमत आहे.
2 / 7
32 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 6,199 एवढी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 11 जुलैपासून फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi Home वर मिळणार आहे.
3 / 7
शाओमीने या फोनला स्मार्ट देशाचा स्मार्टफोन असे म्हटले आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये येत आहे. रेडमी 7 ए वर शाओमी जुलैमध्ये अॅनिव्हर्सरी ऑफर देत आहे.
4 / 7
शाओमीने या फोनला स्मार्ट देशाचा स्मार्टफोन असे म्हटले आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये येत आहे. रेडमी 7 ए वर शाओमी जुलैमध्ये अॅनिव्हर्सरी ऑफर देत आहे.
5 / 7
Redmi 7A या स्मार्टफोनला 5.45 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तर वेगळा मायक्रो एसडी कार्ड देण्यात आला आहे. याद्वारे 256 जीबीपर्यंत वाढविण्यात येते.
6 / 7
शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 10 वॅट चार्जिंगसोबत 4 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी 17 दिवस स्टँडबाय येऊ शकते.
7 / 7
रेडमीच्या स्वस्तातल्या फोनमध्ये सोनीचा 12 मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा एआय ब्युटी मोड देण्यात आला आहे. रेडमी 7ए मध्ये ड्युअल नॅनो सिम स्लॉट देण्यात आला आहे. या स्मार्टफोन 3.5 एमएमचा हेडफोन जॅक दिलेलेा आहे. तसेच हा फोन ब्ल्यूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओ देण्यात आला आहे.
टॅग्स :xiaomiशाओमी