शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Mi 10i भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 4:00 PM

1 / 10
स्मार्टफोन तयार करणारी कंपनी शाओमीनं आपला फ्लॅगशिप सीरिजचा नवा स्मार्टफोन Mi 10i आज भारतात लाँच केला.
2 / 10
नव्या वर्षातला शाओमीचा हा पहिलाच फोन आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार Mi 10i यातील i चा अर्थ इंडिया असा आहे. या मोबाईलचं उत्पादन भारतातच करण्यात आल्याचंही कंपनीनं सांगितलं.
3 / 10
Mi 10i च्या सुरूवातीच्या मॉडेलची किंमत २०,९९९ रूपये इतकी आहे. या किंमतीत ६ जीबी रॅम आणि ६४ जीबीचं स्टोरेजही मिळणार आहे.
4 / 10
दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये ६ जीबी रॅमसोबत १२८ जीबीचं स्टोरेज देण्यात आलं आहे. याची किंमत २१,९९९ रूपये इतकी आहे. तर तिसर व्हेरिअंटमध्ये ८ जीबीची रॅम आणि १२८ जीबीचं स्टोरेज देण्यात आलं आहे. याची किंमत २३,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे.
5 / 10
Mi 10i हा स्मार्ट फोन तीन कलर्समध्ये ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये पॅसिफिक सनराईझ, मिडनाईट ब्लॅक आणि अटलांटिक ब्लू या रंगांचा समावेश आहे. Mi 10i हा स्मार्टफोन Mi स्टोअर्स, रिटेल स्टोअर्स आणि कंपनीच्या पार्टनर स्टोअर्सवर केली जाणार आहे. तसंच ७ जानेवारीपासून हा मोबाईल अॅमेझॉनवरही विक्रीसाठी उपलब्ध असेल.
6 / 10
या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना काही बेनिफिट्सही मिळणार आहे. यासोबत जिओचे १० हजार रूपये मूल्याचे बेनिफिट्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना २ हजार रूपयांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. ओपन सेलची सुरूवात ८ जानेवारीपासून केली जाणार आहे.
7 / 10
Mi 10i मध्ये ६.६७ इंचाचा फूल एचडीप्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात वॉटर ड्रॉप स्टाईल नॉचही आहे. याव्यतिरिक्त डिस्प्ले १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. तसंच या स्मार्टफोनमध्ये HDR आणि HDR+ चा सपोर्टही आहे. फोनच्या प्रोटेक्शन साठी दोन्ही बाजूंना गोरिला ग्लास ५ देण्यात आली आहे.
8 / 10
Mi 10i मध्ये Qualcomm Snapdragon 750G हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यात Adreno 619GPU आहे. यामध्ये साईड माऊंडेट फिंगरप्रिन्ट स्कॅनरही देण्यात आला आहे. तसंच हा स्मार्टफोन IP53 स्प्लॅशप्रुफ आहे.
9 / 10
फोटोग्राफीच्या चाहत्यांसाठी या मोबाईलला चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्रायमरी कॅमेरा हा १०८ मेगापिक्सेलचा आहे. तसंच दुसरा कॅमेरा हा ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. यामध्ये १२० डिग्री फील्ड ऑफ व्ह्य़ू देण्यात आलं आहे. याव्यतिक्त अन्य दोन्ही कॅमेरे २ मेगापिक्सेलचे आहेत. तर पुढील बाजूला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
10 / 10
Mi 10i या स्मार्टफोनमध्ये ४,८२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा फोन ३३ वॅट फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतो. ३० मिनिटांमध्ये हा मोबाईल ६८ टक्के चार्ज होत असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. तसंच या फोनमध्ये ५ जी सुविधेसह युएसबी टाईप सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅकही पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानxiaomiशाओमीMobileमोबाइलIndiaभारतMake In Indiaमेक इन इंडिया