Xiaomi Redmi Note 6 Pro लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खासियत! By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:02 AM
1 / 7 शाओमी रेडमी नोट 6 Pro भारतात 22 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. फिल्पकार्ट आणि मी डॉट कॉमवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 2 / 7 ब्लॅक फ्रायडेच्या निमित्ताने सेलचं आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये शाओमीच्या या स्मार्टफोनची विक्री करण्यात येणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी 12 वाजता शाओमी रेडमी नोट 6 Pro चा पहिला सेल असणार आहे. 3 / 7 शाओमी रेडमी नोट 6 ची किंमत साधारण 15 ते 20 हजारादरम्यान असू शकते. मात्र कंपनीने भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असणार आहे याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 4 / 7 शाओमी रेडमी नोट 6 Pro हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरोज असलेल्या फोनची किंमत थायलंडमध्ये 6,990 THB आहे. 5 / 7 शाओमी रेडमी नोट 6 Pro हा स्मार्टफोन मीयूआई 10 वर काम करत असून अॅन्ड्रॉईड ओरियो 8.1 वर आधारित आहे. तसेच 6.26 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 6 / 7 स्मार्टफोममध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 636 प्रोसेसर देण्यात आला असून 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 7 / 7 शाओमी रेडमी नोट 6 Pro मध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप असणार आहे. आणखी वाचा