Xiaomi's Redmi Note 6 Pro came; Black Friday bumper offer on flip kart
Xiaomi चा Redmi Note 6 Pro आला; उद्या ब्लॅक फ्रायडेची बंपर ऑफर By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 4:59 PM1 / 9चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने आज भारतात Redmi Note श्रेणीमधील Note 6 Pro लाँच केला. या फोनला याआधी थायलंड आणि इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आले आहे. हा फोन उद्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 2 / 9Redmi Note 6 Pro च्या लाँचिंगबाबत भारतातील प्रमुख मनू कुमार जैन यांनी माहिती दिली होती. आज हा मोबाईल लाँच करण्यात आला. हा फोन 23 नोव्हेंबरपासून Flipkart वर उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची 4GB+64GB व्हेरिअंटची किंमत 13,999 तर 6GB+64GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आहे. 3 / 9Note 6 Pro मध्ये 6.23 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे 2280×1080 पिक्सल रिझोल्युशन देण्यात आले आहे. 4 / 9फोनमध्य ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी सेन्सर 1.4μm, ड्युअल पीडी फोकस, ड्युअल टोन एलईडीसोबत 12 मेगापिक्सलचा आहे. तर सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. 5 / 9फोनमध्ये MIUI 10 वर आधारित अँड्राईड 8.1 देण्यात आली आहे. MIUI 10 चा हा कंपनीचा पहिलाच फोन आहे. यामध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 6 / 9फोनमध्ये हायब्रिड सिम कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. यामुळे एकतच दुसरे सिम किंवा मेमरी कार्ड वापरू शकणार आहात. 128 जीबी पर्यंत मेमरी वाढविता येणार आहे. 7 / 9पुढील बाजुलाही ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून Sony IMX376 सेन्सरसह प्रायमरी फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सल आणि 2 मेगा पिक्सलचा सेकंडरी फ्रंट कॅमेरा असणार आहे. 8 / 9फोनमध्ये 1.8GHz Qualcomm स्नॅपड्रॅगन 636 चीपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी अॅड्रीनो 509 जीपीयू देण्यात आला आहे. 9 / 9हा फोन फ्लिपकार्टसह एमआयच्या दालनांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवरही मिळणार आहे. उद्याच्या सेलमध्ये दोन्ही व्हेरिअंटसाठी 1000 रुपयांची सूट देण्यात आलेली आहे. शिवाय एचडीएफसी बँकेकडून 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. अशा प्रकारे बेस व्हेरिअंटला 12,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय जिओकडून 6 टीबी डेटा आणि 2400 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications