you know these whatsapp tricks?
WhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:55 PM1 / 5सध्या WhatsAppचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. जास्तकरुन युजर्स मेसेज पाठविण्यासाठी किंवा चॅटिंग करण्यासाठी WhatsAppचा उपयोग करत आहेत. WhatsApp सुद्धा आपल्या युजर्संना नव-नवीन फीचर्स आणत आहे. यामधील काही खास ट्रिक्स आपण पाहूया. 2 / 5WhatsApp वर तुम्ही मातृभाषेत चॅटिंग आणि मेसेज करु शकता. इंग्रजी शिवाय WhatsApp वर इतर 10 भारतीय भाषांचा वापर तुम्ही करु शकता. यामध्ये मराठी, पंजाबी, गुजराती अशा 10 भाषांचा समावेश आहे. 3 / 5WhatsApp वर आपली भाषा सेट करण्यासाठी सेटिंग्स (Settings) मध्ये जा. त्यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. त्यात Chats वर क्लिक करा. Chats वर क्लिक केल्यानंतर App Language वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवी ती भाषा निवडा. 4 / 5WhatsApp वर आपली आवडती भाषा निवडल्यानंतर फोनच्या सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये System वर क्लिक करा. यामधील Languages & input (Gboard) ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर Languages ऑप्शनमध्ये जाऊन आपली भाषा अॅड करा. 5 / 5WhatsApp मध्ये एखादा मेसेज तुम्हाला Bold लेटर्समध्ये पाठवायचा असल्यास, मेसेजच्या आधी आणि नंतर * (ऐस्टरिस्क) टाइप करा. म्हणजे, तुम्हाला How are you बोल्ड लेटर्समध्ये पाठवायचे आहे. तर, *How are you* असे लिहा. जर तुम्हाला इटॅलिकमध्ये (तिरपे अक्षर) मेसेज पाठवायचा असल्यास, मेसेजच्या आधी आणि नंतर _ (अंडरस्कोर) टाइप करा. असे केल्यानंतर मेसेज इटॅलिकमध्ये जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications