Is your power bank real or fake ? Recognize that
तुमच्याकडील पॉवर बँक खरा की खोटा? असा ओळखा By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 8:38 PM1 / 6मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे आज पॉवर बँक ही गरजेची वस्तू बनली आहे. मात्र आपल्याकडे असलेला पॉवर बँक खरा की खोटा हे ओखळणे बऱ्याचदा कठीण जाते. मात्र काही गोष्टी विचारात घेतल्या तर तुमच्याकडील पॉवर बँक ही खरी आहे की खोटी हे तुमच्या सहज लक्षात येऊ शकते. 2 / 6खऱे पॉवर बँक बाजारामध्ये खऱ्या नावानिशी उपलब्ध असतात, ते आपल्या नावातील अक्षरांमध्ये कधीच बदल करत नाहीत. 3 / 6पॉवर बँकचे वजन कमी असल्यास तो खोटा आहेत हे समजून जा. त्यामुळे कमी वजनाचा पॉवर बँक कधी खरेदी करू नका. 4 / 6कधी कधी काही पॉवर बँकवर कंपनीचे नाव असते, पण त्यांची किंमत कमी असते, असे पॉवर बँकसुद्धा खोटे असतात. कारण चांगल्या ब्रँडेक कंपन्या किंमत कधीच कमी ठेवत नाहीत. 5 / 6कंपनीचे नाव - तुमच्याकडे असलेल्या पॉवर बँकवर कंपनीचे नाव नसेल तर ती पॉवर बँक खोटी आहे. काही पॉवर बँकवर नुसते पॉवर बँक असे लिहिलेले असते ते खोटे असतात.6 / 6खरा पॉवर बँक वजनदार असतो. त्यात लाइट डिस्प्ले म्युझिकसारखे फिचर्स नसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications