Is your smartphone 5G ready? want to buy 5G phone? Here’s everything you need to know
5G SmartPhone Guide: चुकूनही खरेदी करू नका हे 5G फोन; नाहीतर 'बँड' वाजलाच म्हणून समजा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:50 PM1 / 10जर तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे आणि काही महिन्यांत 5जी येईल म्हणून जर 4जी सोडून 5जी फोन घ्यालया जात असाल तर सावधान. त्या आधी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की जो ५जी फोन तुम्ही घेणार आहात तो प्रत्यक्षात 5जीवर चालेल की नाही. (how to choose 5g phone in frequency band)2 / 10धक्का बसला ना, होय. सध्या स्वस्तातल्या शाओमी, रिअलमीपासून वनप्लसपर्यंत जवळपास साऱ्याच कंपन्या 5G फोन विकू लागल्या आहेत. एवढेच नाही तर काही कंपन्यांचा प्रत्येक फोन 5G रेडी असल्याचा दावा कंपन्या करत आहेत. हे 5जी रेडी म्हणजे ५जी नव्हे. 3 / 10या कंपन्या लोकांना 5G मोठ्या अक्षरात दाखवतात. मात्र, 5G साठी वापरलेले बँड दाखवत नाहीत. ते कुठेतरी मागच्या बाजुला, कोपऱ्यात बारीक अक्षरात लिहिलेले असतात. इथेच फसवणूक होते. बऱ्याच कंपन्या सिंगल आणि ड्युअल बँडचा वापर करून स्मार्टफोन विकत आहेत. यामुळे 5G स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी पडताळाव्या लागतील. 4 / 10जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 5G चा जबरदस्त वेग हवा असेल, तर सिंगल किंवा ड्युअल बँडचे फोन खरेदी करू नका. ज्या फोनमध्ये अधिकाधिक फ्रिक्वेंसी बँड असतील ते फोन चांगला स्पीड देतात. सध्या सॅमसंगच्या Galaxy M32 5G मध्ये 12 5G बँडस् आहेत. 5 / 10कारण अद्याप भारतात ५जी ची परवानगी नाही. यामुळे कोणती कंपनी कोणत्या बँडमध्ये नेटवर्क लाँच करेल माहिती नाही. तो बँड तुमच्या मोबाईलमध्ये असला तर वेग नाहीतर 4जी, हे लक्षात ठेवा. 6 / 105G नेटवर्कला तीन महत्वाचे बँड सपोर्ट करतात. यामध्ये लो-फ्रिक्वेंसी, मीडियम रेंज आणि हाई रेंज फ्रिक्वेंसी बँड आहेत. लो आणि मिड बँडस् Sub-GHz मध्ये मोडतात, जे 4G LTE नेटवर्क सारखेच असतात. हेच ते 5जी रेडी वाले. या बँडमध्ये जास्त कव्हरेज (रेंज) मिळते. म्हणजे, फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या प्रकारची मिळते. यामुळे फोन घेताना जास्तीत जास्त लो बँड्स, मिड बँड्स असलेले पहावे. 7 / 10जर तुमच्या फोनमध्ये 1GB पर्यंतचा वेग हवा असेल तर 5G mmWave बँड्सवाले फोन खरेदी करावेत. मात्र, य़ा बँडच्या फोनची किंमत जास्त असते. iPhone 12 मध्ये लो, मिड आणि mmWave बँड मिळतो. परंतू या बँडचा वेग अनुभवायचा असेल तर तुम्ही जेवढे टॉवरच्या जवळ असाल तेवढा जास्त असणार आहे. तसेच झाडे, इमारत आदी अडथळे असता नयेत. 8 / 10भारतात अधिकांश कंपन्या या N41, N77, N78 या बँड्सचे फोन लाँच करत आहेत. हे फोन लो फ्रिक्वेन्सी बँडचे आहेत. तर प्रिमियम फोनमध्ये Sub 6 GHz बँड्स वापरला जात आहे. भारतातील OnePlus 9 Pro मध्ये N41, N78 हे दोन बँड्स वापरण्यात आलेले आहेत. तर अमेरिकेतील OnePlus 9 Pro मध्ये N258, N260 आणि N261 5G mmWave बँड्स देण्यात आले आहेत. 9 / 104G LTE नेटवर्क वर 20Mbps चा वेग मिळतो. जो लो फ्रिंक्वेंसी 5G बँडवर 90-100Mbps असतो. परंतू याचा डाऊनलोडिंग स्पीड हा 15-20Mbps एवढाच असतो. 4G+ नेटवर्कवर 80-90Mbps चा वेग मिळतो. अशावेळी लो बँड 5जी आणि 4जी प्लसमध्ये जास्त अंतर नाही.10 / 10ऑनलाईन 5जी मोबाईल घेताना त्याचे डिस्क्रीप्शन पहावे. दुकानात घेत असाल तर बॉक्सवर बँड्स दिलेले असतात, ते तपासावेत. लक्षात ठेवा, लो बँड्स- 1 GHz पेक्षा कमी. मिड बँड्स (Sub-GHz) 1 ते 2.5 GHz किंवा 3.5 ते 6 GHz आणि हाय बँड म्हणजे 24 GHz वरील(5G mmWave). आणखी वाचा Subscribe to Notifications