youtube know how earn in year 2023
अरे व्वा! YouTube च्या कमाईतून 'त्याने' फेडलं 40 लाखांचं कर्ज; जाणून घ्या, कसे कमवायचे लाखो रुपये? By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 5:33 PM1 / 7YouTube हे व्हिडीओ पाहण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. यावर विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करून लाखो रुपये कमवता देखील येतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. YouTube व्हिडीओच्या माध्यमातून एका तरुणाने इतकी कमाई केली की त्याचं तब्बल 40 लाखांचं कर्ज फेडलं आहे. 2 / 7ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अर्जुन योगान याने दिलेल्या माहितीनुसार, आई सतत आजारी असल्याने वडील नोकरी करू शकत नव्हते. यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी कठीण होती. वडिलांवर तब्बल 40 लाखांचं कर्ज होतं. त्यामुळे सुरुवातीला अर्जुन योगानने नोकरी केली. पण नंतर एनीमशनच्या छंद असल्याने त्याने व्हिडीओ तयार करायला सुरुवात केली. 3 / 7नोकरीतून जितके पैसे मिळत होते तितकेच पैसे व्हिडीओतून मिळू लागल्यानंतर त्याने YouTube चं काम फुल टाईम करायला सुरुवात केलं. अर्जुनने YouTube च्या कमाईतून आपल्या आई-वडिलांवर असलेलं कर्ज देखील फेडलं आहे. 4 / 7अर्जुन आता लंडनमध्ये पेंटहाऊसमध्ये राहतो. तसेच त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कार देखील आहे. तुम्हालाही जर YouTube वरून कमाई करायची असेल तर ते शक्य आहे. फक्त यासाठी एका खास कॅटेगिरीमध्ये व्ह़िडीओ तयार करून ते रेग्यूलर पोस्ट करावे लागतील. 5 / 7आपलं चॅनल चांगलं ग्रो व्हावं, प्रगती व्हावी यासाठी काम करणं गरजेचं आहे. तसेच YouTube मॉनिटायझेशनसाठी काही आवश्यक अटींची पूर्ण करणं गरजेचं आहे. YouTube जाहिरातीच्या माध्यमातून देखील चांगली कमाई करता येते. कमाईचा एक चांगला हिस्सा हा जाहिरातीच्या माध्यमातून मिळतो. 6 / 7व्हिडीओच्यामध्ये सुरू होणाऱ्या जाहिरातीतून क्रिएटर आणि कंपनीची कमाई होते. अटी पूर्ण केल्यानंतर मॉनिटायझेशन सुरू होतं. बँक अकाऊंटमध्ये पैसे देखील मिळतात. YouTube प्रीमीयम सब्सक्रिप्शन आणि चॅनल मेंबरशिपच्या माध्यमातून कमाई करता येते. 7 / 7YouTube Shorts देखील आता वेगाने वाढत आहे. यावर्षी कंपनीने यासाठी अनेक बोनस प्रोग्रामची घोषणा केली आहे. चॅनलचा कंटेंट आणि व्यूजनुसार पैसे दिले जातात. याच्या माध्यमातून युजर्स 10 हजार डॉलर्सपर्यंत कमाई करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications