शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

YouTube वर व्हिडीओ अपलोड करणं होणार कठीण; कंपनीनं तयार केले नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 7:03 PM

1 / 15
YouTube हे जगातील सर्वात मोठं व्हिडिओ पाहण्याचं व्यासपीठ आहे. अशा फारच क्वचित व्यक्ती असतील ज्यांनी YouTube चा वापर केला नाही किंवा त्यांना याबद्दल माहितही नाही.
2 / 15
या ठिकाणी एखाद्या खाद्यपदार्थापासून तंत्रज्ञापार्यंत कोणतेही व्हिडीओ सहजरित्या उपलब्ध असतात. म्हणूनच YouTube हे एक व्यासपीठ आहे जे जाहिरातदारांना अधिक आकर्षित करतं.
3 / 15
सध्या YouTube कडे 2 अब्ज लॉग इन युझर्स आहेत. परंतु अद्याप कॉपीराइट केलेल्या सामग्रीचा गैरवापर थांबविण्यात YouTube तितकं यश आलेलं नाही. म्हणून हे प्रकार रोखण्यासाठी आता कंपनी नवीन नियम तयार करत आहे.
4 / 15
व्हिडिओ अपलोड करणं आणि जाहिरातीद्वारे कमाईची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी YouTube नं एक नवं टूल आणलं आहे. या टूलला त्यांनी 'कॉपिराईट चेक' असं नाव दिलं आहे.
5 / 15
हे टूल व्हिडिओ अपलोड करताना संबंधित व्यक्तीला त्यांच्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट मटेरिअल आहे आणि ते जाहिरातीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरूद्ध असल्याचंही हे टूल सांगणार आहे.
6 / 15
ही नवीन प्रणाली कंटेन्ट आयडीवर अवलंबून आहे. जर एखादा व्हिडिओ स्कॅन केला असेल आणि YouTube ने तो कॉपीराइट करण्यास सांगितलं तर कंपनी तो व्हिडिओ अपलोड करणं थांबवेल.
7 / 15
त्यानंतर ते टूल आपल्याला व्हिडिओचा कोणता भाग काढायचा आहे हेदेखील सांगेल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला तो भाग आपल्या व्हिडिओवरून काढावा लागेल. यानंतरच संबंधित व्यक्तीला तो व्हिडीओ अपलोड करता येईल.
8 / 15
३१ मे नंतर ते YouTubers च्या प्रत्येक कमाईवर आता टॅक्स आकारला जाईल. म्हणजेच जर आपण आपल्या YouTube चॅनेलवरुन महिन्याला १ लाख रुपये कमविले आणि वर देण्यात आलेल्या तारखेपूर्वी आपले टॅक्स डॉक्युमेंट सबमिट केले नाही, तर YouTube आपल्या महिन्याच्या एकूण कमाईमधून २४,००० रुपये वजा करेल.
9 / 15
YouTube ने सर्व YouTubers ना याबाबत अधिकृत मेल पाठविला आहे. अमेरिकन YouTubers वर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकेबाहेरील कंटेंट क्रिएटर्ससाठी हे लागू होणार आहे.
10 / 15
गुगलने आपल्या अधिकृत कम्यूनिकेशनमध्ये आम्ही Adsense टॅक्स भरण्याविषयी माहिती विचारू, ३१ मे २०२१ पर्यंत तुमच्या टॅक्सबाबतची माहिती उपलब्ध नसल्यास, Google तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईमधून २४ टक्के पैसे वजा करेल असं म्हटलं आहे.
11 / 15
कंपनीने जर तुम्ही टॅक्स डॉक्यूमेंटची संपूर्ण माहिती दिली तर तुम्हाला अमेरिकेबाहेरील व्यूअर्ससाठी टॅक्स भरावा लागणार नाही किंवा त्या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही असं म्हटलं आहे.
12 / 15
YouTube च्या या मेलकडे तुम्ही लक्ष दिले नाही आणि तुमची टॅक्स इन्फो सबमिट केली नाही तर तुम्हाला तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या २४ टक्के रक्कम द्यावी लागेल. जर तुम्ही टॅक्स इन्फो जमा केली केली आणि ट्रिटी बेनिफिट पात्र असाल तर तुम्हाला त्या अमेरिकन दर्शकांसाठी १५ टक्के कर भरावा लागेल.
13 / 15
ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमावले आहेत. दुसरीकडे, जर तुम्ही टॅक्स भरला आणि टॅक्स ट्रिटीसाठी पात्र नसाल तर तुम्हाला ३० टक्के कर भरावा लागेल. हा कर अमेरिकन व्यअर्सद्वारे मिळणाऱ्या कमाईवर भरावा लागेल.
14 / 15
गुगलने एक उदाहरण देत म्हटले आहे की जर भारतातील एखादा कंटेट क्रिएटर महिन्यात १००० डॉलर कमावतो आणि त्याने त्यापैकी १०० डॉलर्स अमेरिकन दर्शकांच्या मदतीने कमावले आहेत, तर मग त्याला त्याच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या २४ टक्के रक्कम टॅक्स स्वरुपात द्यावी लागेल.
15 / 15
क्रिएटरला १००० डॉलर्सचे २४ टक्के म्हणजेच २४० डॉलर्स द्यावे लागतील. या नव्या कर प्रणालीमुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण भारतातील यूट्युबर्सना आधीपासूनच अमेरिकेतील यूट्युबर्सपेक्षा कमी पैसे मिळतात.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबonlineऑनलाइनInternetइंटरनेट