youtube will add new translation feature now its on testing
लय भारी! YouTube वर आवडीच्या भाषेत होणार ट्रान्सलेशन, हव्या असलेल्या भाषेत शोधता येणार Video By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 2:30 PM1 / 12YouTube जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्या व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्सपैकी एक आहे. अनेक जण फूड, ट्रॅव्हल, डान्स आणि इतर उपयुक्त गोष्टींबद्द्लचे व्हिडीओ सतत पाहत असतात. यामुळे विविध गोष्टींची माहिती मिळते. 2 / 12YouTube नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. आता देखील असंच एक जबरदस्त फीचर आणलं आहे. YouTube वर आवडीच्या भाषेत आता व्हिडीओ भाषांतरित केला जाईल. तसेच सर्चमध्ये देखील भाषा पर्याय उपलब्ध असेल. 3 / 12नव्या फीचरमध्ये युजर्स आपल्या आवडीच्या मूळ भाषेनुसार व्हिडीओचे शीर्षक, माहिती, कॅप्शन आणि बरंच काही स्वत: भाषांतरित करणार आहे. नेमकं यूट्यूब वरचं हे फीचर कसं असणार हे जाणून घेऊया...4 / 12मीडिया रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर इंग्रजीमधून पोर्तुगीज आणि तुर्कीमध्ये भाषांतरित केलं आहे. हे वेब आणि स्मार्टफोन अॅप्सवर काम करते. हे फीचर का आणले गेले आहे याची सध्या तरी काही माहिती उपलब्ध नाही. 5 / 12जे लोक आपल्या स्थानिक भाषेत व्हिडीओ शोधतात त्यांना लवकरच या फीचरच्या मदतीने भाषांतरूत केलेल्या शीर्षकाच्या मदतीने लोकप्रिय चॅनेल पाहता येतील. सध्या YouTube चे हे फीचर काही प्रमाणात काम करत आहे. 6 / 12ज्यामध्ये इंग्रजी मजकूरावरील व्हिडीओ स्थानिक भाषांमध्ये देखील दिसतात. मात्र काही वेळा अल्गोरिदम अचूक काम करत नाही आणि गोंधळ होतो. मीडिया रिपोर्टनुसार यूट्यूबच्या या नव्या फिचरची सध्या चाचणी घेण्यात येत आहे. 7 / 12नवं फीचर हे फक्त एका विशिष्ट युजरसाठी उपलब्ध आहे. यानंतर, YouTube वर अधिक भाषांमध्ये समर्थन सपोर्ट उपलब्ध होईल. मात्र याबाबत यूट्यूबकडून याबद्दल कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.8 / 12नवीन फीचरमध्ये वेब ट्रान्सलेशन पॉप-अप आणि गुगल ट्रान्सलेशन एआय वापरणारे स्मार्टफोन अॅप्स दाखवले आहेत. या पॉप अपवर क्लिक किंवा टॅप केल्यावर युजर्सच्या स्थानिक भाषेत व्हिडीओचे शीर्षक, माहिती आणि कॅप्शन आपोआप भाषांतरित करेल.9 / 12YouTube अधिक भाषांमध्ये ऑटो कॅप्शन सपोर्ट देखील जोडत आहे. हे फीचर विशेष नसले तरी जे युजर्स इंग्रजी बोलत नाहीत त्यांना हे उपयुक्त ठरेल. इंटरनेटवर एक मोठा वर्ग आहे ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही किंवा किंवा कळत नाही. 10 / 12सध्या, YouTube वेब युजर्स Chrome स्टोअर वरून Google भाषांतरच्या माध्यमातून शीर्षकांचे भाषांतर करू शकतात. अलीकडेच YouTube ने त्याच्या व्यासपीठावर कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर जोडलं आहे. 11 / 12Google अकाऊंटवर समान माहिती न बदलता आपण आपले नाव आणि प्रोफाईल फोटो YouTube स्टुडिओद्वारे बदलू शकता. कन्टेन्ट क्रिएटर्स बर्याच काळापासून या फीचरची मागणी करीत आहेत आणि आता हे सर्व्हर-साइड अपडेट लवकरच रोल आउट होणे सुरू झाले आहे. 12 / 12व्हेरिफाय बॅज असलेल्या क्रिएटर्सना YouTube वर त्यांची माहिती बदलल्यास पुन्हा अर्ज करावा लागेल. युजर्सना या नव्या फीचरचा फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications