zoom security features to protect your data and privacy SSS
Zoom अॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 2:32 PM1 / 15जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.2 / 15सोशल मीडियाचा वापर हा घरबसल्या मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.3 / 15लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अॅप नंबर वन ठरलं आहे. ऑफिसच्या मीटिंगसाठी अनेकजण व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अॅप असलेल्या Zoom चा वापर करत आहेत.4 / 15काही दिवसांपूर्वी झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आल्याची आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात असल्याची माहिती समोर आली.5 / 15झूम अॅपचा डेटा लीक झाल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण काळजी करू नका कारण काही सोप्या पद्धतीने प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षित ठेवता येतो.6 / 154 महिन्यात जवळपास झूमचे 20 पटीने युजर्स वाढले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये झुमचा युजर बेस 10 मिलियन होता तो मार्च 2020 ला 200 मिलियन झालेला आहे.7 / 15लॉकडाऊनमध्ये झुमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे . याच दरम्यान आपला डेटा सेफ कसा ठेवायचा जाणून घेऊया.8 / 15हॅकरपासून वाचण्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. मिटिंगसाठी पासवर्डचा वापर करा यामुळे डेटा सुरक्षित राहील.9 / 15वेटिंग रूम फीचरच्या मदतीने अॅडमीन मिटिंगमध्ये सामील होणाऱ्या लोकांना कंट्रोल करू शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तील मिटिंगचा अॅक्सेस देऊ शकतो. 10 / 15या फीचरच्या मदतीने नको असलेल्या व्यक्तीला मिटिंगमध्ये सामील होण्यापासून रोखू शकतात. म्हणजेच होस्टच्या आधी कोणीही मिटिंग जॉईन करू शकत नाही.11 / 15झूमवर मिटिंग लॉक करण्याच्या देखील ऑप्शन देण्यात आला आहे. यामुळे मिटिंग सुरक्षितरित्या करता येते.12 / 15अॅडमिनने एखाद्या व्यक्तीला मिटिंगमधून रिमूव्ह केलं असेल तर झूमवर त्याला रिजॉईन करण्यापासून रोखण्याचा देखील पर्याय आहे13 / 15झूमच्या फ्री व्हर्जनमधील कॉलमध्ये एकाचवेळी 100 लोक जोडले जाऊ शकतात.14 / 15प्रोफेशनल शिवाय युजर्स या अॅपचा वापर हा पर्सनल कॉलसाठी देखील करीत आहेत.15 / 15झूम अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सोपे युजर इंटरफेस आहे. तसेच या अॅपमध्ये युजर्सना अनेक फीचर देण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications