Ex-Wimbledon champ Ilie Nastase, 73, marries FIFTH wife who is 30 years his junior
अरे देवा: विम्बल्डन विजेता 73 व्या वर्षी चढला बोहल्यावर; 30 वर्षांनी लहान आहे पाचवी पत्नी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 2:58 PM1 / 6विम्बल्डनचा माजी विजेता एली नॅस्टासे यानं मंगळवारी पुन्हा एकदा लग्न केलं. 73 वर्षीय नॅस्टासेचं हे पाचवं लग्न आहे आणि त्याची पत्नी त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. 2 / 6रोमानियाच्या कोस्टांटा येथे अगदी साधेपणानं नॅस्टासे आणि आयओना सिमिओना यांचा विवाह झाला. त्यांच्या या लग्नाला मोजकाच मित्रपरिवार उपस्थित होता. नॅस्टासेनं सांगितले की,''अगदी साधेपणानं आम्ही हे लग्न केलं. कोणताही गाजावाजा न करता आम्हाला लग्न करायचे होते. माझ्या पत्नीलाही हेच हवं होतं.''3 / 6सप्टेंबर 2018मध्ये माजी टेनिसपटूनं चौथी पत्नी ब्रिगीट स्फॅट हीच्याशी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून नॅस्टासे व सिमिओना यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यांच्या लग्नाला रोमानियाचा माजी फुटबॉलपटू सिप्रियन मारीका आणि त्याची पत्नी उपस्थित होती. 4 / 6नॅस्टासेनं सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यानं यापूर्वी डोमिनिक ग्रेसिया (1972-1980), अॅलेक्झांड्रा किंग, अमालिया नॅस्टासे आणि स्फॅट यांच्याशी विवाह केला होता. आधीच्या पत्नींपासून त्याला चार मुली व दोन मुलं आहेत. 5 / 6नॅस्टासेनं 1973मध्ये विम्बल्डनचे दुहेरी जेतेपद, 1970 व 72मघ्ये मिश्र गटाचे जेतेपद जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी फ्रेंच ओपन व अमेरिकेन ओपन स्पर्धा जिंकली आहेत. 1972मध्ये नाईकेनं करारबद्ध केलेला तो पहिला व्यावसायिक क्रीडापटू होता. 6 / 62017मध्ये रोमानियन संघाचे फेड कप स्पर्धेत नेतृत्व करताना त्यानं शिविगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर बंदी घातली गेली. आणखी वाचा Subscribe to Notifications